शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

झोपलेला बिबट्या पाहताच महिलेला आली भोवळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:12 IST

तालुक्यातील दापूर व चापडगाव शिवार हा बागायती परिसर आहे. भोजापूर धरणामुळे या भागात पिकांसाठी बारमाही पाणी उपलब्ध असते. ...

तालुक्यातील दापूर व चापडगाव शिवार हा बागायती परिसर आहे. भोजापूर धरणामुळे या भागात पिकांसाठी बारमाही पाणी उपलब्ध असते. त्यामुळे तीव्र उन्हाळ्यात बागायती पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो, तसेच डोंगराळ भाग असल्याने या भागात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. सिन्नर - अकोले रस्त्यालगत चापडगाव शिवारात गट नंबर ५२ मध्ये रेवजी चिमा आव्हाड यांची शेतजमीन आहे. मंगला आगिवले (३७) ही महिला सकाळी शेतात काम करण्यासाठी गेली होती. शेतात बिबट्या झोपलेला असल्याची माहिती आजूबाजुच्या शेतकऱ्यांना दिली. शेतकऱ्यांनाही आश्चर्य वाटले. महिलेने आरडाओरड केल्यानंतरही बिबट्या जागचा हलला कसा नाही. ही महिला गणेश रामनाम आव्हाड यांची शेतजमीन हिश्श्याने करते. परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे आसपासच्या शेतकऱ्यांनी दबक्या पावलांनी शेतात प्रवेश केला. पडलेल्या बिबट्याचा अंदाज घेत एकेक पाऊल पुढे टाकले. तरी बिबट्या निद्राधीन. लांबूनच खडाही टाकून पाहिला; मात्र बिबट्याची काहीच हालचाल दिसेना. मग दोन-चार जणांनी धाडस दाखवत पुढे जाऊन शहानिशा केली असता, बिबट्या मृत आढळून आला. शेतमालक आव्हाड यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी वन विभागाला कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, वनपाल प्रीतेश सरोदे, के. आर. इरकर आदींसह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

इन्फो...

न्युमोनिया व उपासमारीने मृत्यू

वनपरीक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून दोन वर्षीय मृत मादी बिबट्याला शवविच्छेदनासाठी दोडी येथे हलविले. पशुधन विकास अधिकारी वर्पे यांनी शवविच्छेदन केले. त्यात मादी बिबट्याला न्युमोनिया झालेला आढळून आला. न्युमोनियामुळे तिच्या अंगात शिकार करण्यासाठी त्राण उरले नसावेत आणि त्यातच उपासमार झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा वन विभागाचा अंदाज आहे. माळेगाव- मोहदरी येथील वनोद्यानात या मादी बिबट्यावर अग्निसंस्कार करण्यात आले. सहायक वनसंरक्षक अनिल पवार यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

===Photopath===

280521\28nsk_42_28052021_13.jpg

===Caption===

बिबट्या