शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात अद्यापही सव्वादोन लाख शिधापत्रिका आधार लिंकविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 20:26 IST

नाशिक : सार्वजनिक वितरणप्रणाली व्यवस्थेंतर्गत गरीब व गरजू व्यक्तींना धान्य पुरवठा केला जातो. यात जिल्ह्यातील 7 लाख 56 हजार 627 शिधापत्रिकांची लिंकिंग आधारशी करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, अद्यापही दोन लाख 25 हजार शिधापत्रिका आधार कार्डाशी संलग्न झालेल्या नसून अपग्रेडेशनचे काम वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींमुळे मंदगतीने सुरू असल्याने उर्वरित आधार ...

ठळक मुद्देलाभाथ्र्याना नियमित धान्य पुरवठालिंकिंग प्रक्रिया धिम्या गतीने जिल्ह्यात 7 लाख 56 हजार 627 लाभार्थीतांत्रिक अडचणींमुळे मंदगतीने लिंकिंग

नाशिक : सार्वजनिक वितरणप्रणाली व्यवस्थेंतर्गत गरीब व गरजू व्यक्तींना धान्य पुरवठा केला जातो. यात जिल्ह्यातील 7 लाख 56 हजार 627 शिधापत्रिकांची लिंकिंग आधारशी करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, अद्यापही दोन लाख 25 हजार शिधापत्रिका आधार कार्डाशी संलग्न झालेल्या नसून अपग्रेडेशनचे काम वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींमुळे मंदगतीने सुरू असल्याने उर्वरित आधार कार्ड संलग्निकरणासाठी सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.जिल्हा पुरवठा कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्या माध्यमातून गरीब व गरजू लोकांना धान्याचे व रॉकेलचे वितरण करण्यात येत असते. राज्य शासनाने अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील सर्वच शिधापत्रिकाधारकांचे कार्ड आधार कार्डाशी संलग्न करण्याचे काम हाती घेतले असून, जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब लाभार्थीसह अन्य योजनेअंतर्गत एकूण शिधापत्रिकाधारकांची संख्या 7 लाख 56 हजार 627 इतकी आहे. यात अंत्योदय बीपीएल व के शरी शिधापत्रिकांतून प्राधान्यक्रमाचे लाभाथ्र्याचा समावेश असून, यापैकी 5 लाख 10 हजार शिधापत्रिका आधारकार्डाशी लिंक झाले आहेत. उर्वरित 2 लाख 25 अद्यापही आधारकार्डाशी लिंकिंग झालेले नाही. जिल्ह्यात महिन्याला सरासरीत 25 ते 30 हजार शिधापत्रिकांचे संलग्नीकरण व दुरुस्तीचे काम सुरू असून, या गतीनेच संलग्नीकरणाचे काम सुरू राहिल्यास संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याची प्रक्रिया जवळपास सहा ते सात महिने चालण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्ह्यात एकूण साडेसात लाख शिधापत्रिका असून, पाच लाख शिधापत्रिका आधारशी लिंक झाल्या आहेत. परंतु अद्यापही सव्वादोन लाख शिधापत्रिकांचे संलग्नीकरण व दुरुस्तींचे काम सुरू आहे. परंतु याचा धान्य पुरवठय़ावर कोणताही परिणाम झालेला नसून सर्व 7 लाख 56 हजार 627 लाभाथ्र्याना पुरवठा करण्यात येत आहे. यात आधार लिंक नसलेल्या, परंतु लाभार्थी असलेल्या शिधापत्रिकाधारकांचाही समावेश असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार यांनी दिली.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डcollectorतहसीलदार