शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

व्यायाम साहित्य वाटप न करताच ग्रामपंचायतींकडे पडून

By admin | Updated: August 8, 2014 01:34 IST

क्रीडा व व्यायाम प्रकाराचे साहित्य प्रत्यक्षात वाटप न करताच ग्रामपंचायतींकडे पडून

नाशिक : शासनाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे क्रीडानैपुण्य वाढविण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतींना पुरविलेले क्रीडा व व्यायाम प्रकाराचे साहित्य प्रत्यक्षात वाटप न करताच ग्रामपंचायतींकडे पडून असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत उघड झाली.शिक्षण समितीची बैठक सभापती ज्योती बाळासाहेब माळी यांच्या उपस्थितीत झाली. दरम्यान, साहित्य वाटप न करणाऱ्या जिल्ह्णातील २७० ग्रामपंचायतींच्या संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव शिक्षण समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला. या वर्षाकरिता व्यायाम साहित्यासाठीची दोन लाखांची रक्कम वाढवून सात लाख करण्यात आली असून, लवकरच या रकमेतून संबंधित ग्रामपंचायतींना व्यायाम व क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. कोचरगाव येथील प्राथमिक शाळेत ७२५ विद्यार्थिसंख्या असल्याने दोन सत्रांत शाळांचे वर्ग चालविण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. येवला तालुक्यातील विद्यार्थ्यांची चुकीची संख्या कळविल्याने येवल्याला दोन हजार पुस्तकांचा संच कमी आला. त्यामुळेच चुकीची माहिती पाठविणाऱ्या गटशिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सदस्य प्रवीण गायकवाड यांनी केली. तसेच शिक्षण हक्क कायद्यानुसार पाचवीचे ५३० व आठवीचे १६७ वर्ग सुरू झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी दिली. जिल्ह्णातील ४३७ शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या २० च्या आत आहे. अशा शाळांमध्ये ८०५ शिक्षक कार्यरत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यातील ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या दहाच्या आत असेल अशा शाळा बंद करून त्या शाळांतील विद्यार्थी एक किलोमीटर परिसराच्या आतील शाळांमध्ये वर्ग करण्यात यावेत, असा ठरावही प्रवीण गायकवाड यांनी मांडला. त्यास उषा बच्छाव यांनी अनुमोदन दिले. येवला येथे सात विद्यार्थ्यांना अतिसाराची लागण झाली. त्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळांमध्ये शुद्ध पाणीपुरवठा होतो की नाही याची तत्काळ तपासणी करून अहवाल पाठविण्यात यावा. ज्या शाळा अहवाल पाठविणार नाहीत त्या शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय झाला. बैठकीस प्रा. अशोक जाधव, माधुरी बोरसे, कल्पना सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी रहीम मोेगल आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)