शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

करवा चौथद्वारे महिलांनी केली पतीच्या दीर्घायुष्याची कामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:37 IST

शहरातील उत्तर भारतीयांसह विविध महिलांनी दिवसभर ‘करवा चौथ’ व्रत करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना केली. कोजागरी पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला म्हणजेच शनिवारी (दि.२७) हे व्रत करण्यात आले. त्यानुसार महिलांनी दिवसभर निर्जली उपवास केला. चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्र आणि मग पतीचे औक्षण करून व्रताची सांगता करण्यात आली.

नाशिक : शहरातील उत्तर भारतीयांसह विविध महिलांनी दिवसभर ‘करवा चौथ’ व्रत करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना केली. कोजागरी पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला म्हणजेच शनिवारी (दि.२७) हे व्रत करण्यात आले. त्यानुसार महिलांनी दिवसभर निर्जली उपवास केला. चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्र आणि मग पतीचे औक्षण करून व्रताची सांगता करण्यात आली.  मुख्यत्वे उत्तर भारतातील असलेल्या आणि सध्या नाशिकस्थित महिलांनी श्रद्धेने आणि उत्साहाने हे व्रत केले. या उपवासाच्या आदल्या दिवशी हातावर मेहंदी रेखाटली. लाल रंगाच्या साड्या किंवा ड्रेस परिधान केले. नवी वस्त्रे आणि सोळाशृंगार हे या व्रताचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. यासाठी महिलांनी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत खरेदी पूर्ण केली  होती.  रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर चाळणीतून चंद्राचे आणि पतीचे दर्शन घेत, त्यांचे औक्षण केले व नंतर उपवास सोडला. करवा चौथच्या दिवशी पुरी, भाजी, शिरा असा स्वयंपाक केला जातो. भात शिजवला जात नाही. त्याचे पालन करत स्वयंपाक करण्यात आला होता.म्हणून केली जाते ‘करवा चौथ’ची पूजासात भावांची आवडती आणि एकुलती एक बहीण वीरावती ही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जली उपवास ठेवते. चंद्राचे दर्शन होत नसल्याने तिला आपला उपवास सोडता येत नाही. त्यामुळे अन्न पाण्यावाचून तिष्ठत असलेल्या आपल्या बहिणीला पाहून या सातही भावांना दु:ख होते. जोपर्यंत चंद्रदर्शन होणार नाही तोपर्यंत वीरावती अन्न ग्रहण करणार नाही हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. त्यामुळे शक्कल लढवून ते वीरावतीला उपवास सोडायला भाग पाडतात. घराशेजारी असणाºया झाडावर गोलाकार आरसा ठेवून तो चंद्र आहे असे सांगत तिचे सातही भाऊ तिला उपवास सोडायला भाग पाडतात. भावांच्या सांगण्यावर विश्वास ठेवत वीरावतीदेखील आपला उपवास सोडते. पण खºया चंद्राचे दर्शन न घेता व्रताचा नियम मोडल्यामुळे तिचा पती मरण पावतो. भावांकडून फसवले गेल्यामुळे आणि पतीचा मृत्यू झाल्यामुळे दु:खी झालेली वीरावती अश्रू ढाळत बसते. अशावेळी देवी तिथे प्रगट होते. रडणाºया वीरावतीला दु:खाचे कारण विचारते. तेव्हा वीरावती सगळी कहाणी सांगते. वीरावती आणि तिच्या भावाकडून अनावधानाने झालेली चूक लक्षात घेता देवी तिला पुन्हा उपवास करायला सांगते आणि वीरावतीचा पती पुन्हा जिवंत होतो. अशी ही दंतकथा या व्रतामागे आहे. इतरही अनेक कथा प्रचलित आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमcultureसांस्कृतिक