शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

वाहतूक शाखेला सुचले शहाणपण

By admin | Updated: August 25, 2015 23:46 IST

तपोवन साधुग्राम : रिक्षाचालकांची दबंगगिरी

पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्याला प्रारंभ झाल्यानंतर दैनंदिन शेकडो भाविक तपोवन साधुग्राममध्ये साधू-महंतांच्या देवदर्शनासाठी, तसेच तपोवन फिरण्यासाठी दाखल होत आहेत. रविवारच्या दिवशी, तर भाविकांनी तपोवनात तोबा गर्दी केल्याने संपूर्ण तपोवन परिसरात एकच वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसले. वाहतूक कोंडी करण्याचे काम प्रामुख्याने शहरातील रिक्षाचालकांनीच केल्याची कबुली खुद्द पोलीस प्रशासनाने दिली आहे. खाकी वर्दीतील पोलीस कर्मचाऱ्यांना शह देत काही रिक्षाचालकांनी, तर थेट चालकाच्या आसनशेजारी दोन ते तीन प्रवासी बिनधास्तपणे बसवून पोलिसांवरच दबंगिरी केल्याची चर्चा आता रंगली आहे.रविवारच्या दिवशी तपोवनात वाहतुकीची कोंडी झाली असली तरी, बोटावर मोजण्या इतकेच वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे या वाहतूक शाखेच्या कार्यालयाच्या डोळ्यादेखत रिक्षाचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करत असल्याचे चित्र असतानाही त्या कर्मचाऱ्यांनी डोळेझाक करून एकप्रकारे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करण्यासाठी जणू रिक्षाचालकांनाच एकप्रकारे मुभा दिल्याचे दिसून आले.वाहतूक शाखेला सोमवारी उशिरा शहाणपण सुचले आणि ‘वरातीमागून घोडे’ या म्हणीप्रमाणे वाहतूक शाखेने सोमवारी सायंकाळी साधुग्राममध्ये रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे मान्य करत साधुग्राम कार्यालय (रामानुजाचार्य प्रवेशद्वाराकडून) चालकांना रिक्षा नेण्यास बंदी घातली. ज्या दिवशी भाविकांची गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली होती. रिक्षाचालकांना प्रवेशबंदी करण्यापेक्षा वाहतूक शाखेने सोमवारच्या दिवशी रिक्षांना तपोवनात प्रवासी घेऊन जाण्यास बंदी केल्याने वाहतूक शाखेच्या कारभाराविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पालक-शिक्षक संघाची निवडनाशिकरोड : लहवित येथील जनता विद्यालय पालक-शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्ष मुख्याध्यापक मृणाल पेखळे, उपाध्यक्ष- संजय गायकवाड, सचिव- एस. जी. थेटे, सहसचिव- मधुकर शिंदे, दिलीप जारस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.