शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिल वसुलीवरून वायरमनला केली बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 18:02 IST

सटाणा : वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला शेतकरीपुत्राने मारहाण करून दमबाजी केल्याची घटना बागलाण तालुक्यातील खमताणे शिवारात घडली. महावितरणच्या सटाणा विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ भास्कर खैरनार यांनी याबाबत सटाणा पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी सागर जाधव याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

ठळक मुद्देशासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शेतकरी पुत्रास अटक

सटाणा : वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला शेतकरीपुत्राने मारहाण करून दमबाजी केल्याची घटना बागलाण तालुक्यातील खमताणे शिवारात घडली. महावितरणच्या सटाणा विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ भास्कर खैरनार यांनी याबाबत सटाणा पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी सागर जाधव याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.दरम्यान या घटनेमुळे आक्रमक झालेल्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बागलाणच्या तहसीलदारांना निवेदन दिले असून संबधितावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. बुधवारी (दि.२६) सकाळी सात वाजता महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ भास्कर खैरनार हे मदतनीस रवींद्र पवार यांना सोबत घेवून खमताणे शिवारात थकीत वीजबिल वसुलीसाठी निघाले होते. रोहिदास जाधव यांच्या शेताजवळ दोन्ही कर्मचारी आले असता तेथे उभा असलेला सागर वसंत जाधव (रा.मुंजवाड) याने तुम्ही आमचा ट्रान्सफार्मर का बंद केला. म्हणून वाद घातला असता भास्कर खैरनार यांनी खमताणे शिवारातील ट्रान्सफार्मर क्र मांक चार वरील शेतकºयांकडे थकीत वीजबिल असल्याने वरिष्ठ अधिकारी कल्याणी भोये यांच्या आदेशावरून आम्ही वीजपुरवठा खंडित केल्याचे सांगितले. तुमच्या वडिलांच्या नावे असलेले ३७ हजार ७६० रु पयांचे वीजबिल भरणा करा, लगेच तुमचा विद्युत पुरवठा सुरु करतो असे सांजितल्याने, त्याचा राग आल्याने सागर जाधव याने भास्कर खैरनार यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जर तू आमचा ट्रान्सफार्मर चालु केली नाही तर तुझा बेत पाहतो असा दम देखील संशयिताने दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.आपल्या कर्मचाºयाला मारहाण झाल्याचे कळताच महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल उईके, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर टी पवार, उपअभियंता अभिजित आहिरे, सहाय्यक उपअभियंता कल्याणी भोये, टी. बी. कापसे, कनिष्ठ अभियंता अजिंक्य जोशी, सहाय्यक अभियंता भाऊलाल नागरे यांच्यासह महावितरणच्या सर्व युनियन व संयुक्त कृती समितीचे कर्मचाºयांनी बागलाणचे तहसीलदार प्रमोद हिले यांची भेट घेवून सबंधित मारहाण करणाºया युवकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून अशा प्रकारांवर अंकुश लावण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात लेखी निवेदन दिले आहे.