शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेंटरमध्ये वायरलेस आरोग्य तपासणी यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:25 IST

कळवणला महिन्याभरात ऑक्सिजन जनरेशन प्लांट कार्यान्वित होणार आमदार नितीन पवार यांची माहिती कळवण : येथील उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी ५० ...

कळवणला महिन्याभरात ऑक्सिजन जनरेशन प्लांट कार्यान्वित होणार आमदार नितीन पवार यांची माहिती

कळवण : येथील उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी ५० बेडचे ऑक्सिजन कोविड सेंटर मंजूर करण्यात आले असून, त्यात १५ व्हेंटिलेटर बेडचा समावेश आहे. ५०० बेडच्या या कोविड सेंटरमध्ये वायरलेस आरोग्य तपासणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात ही यंत्रणा प्रथमच कळवण उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये राबविण्यात येत असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.

उपजिल्हा रुग्णालयातील ५० बेडच्या कोविड सेंटरचे काम युद्धपातळीवर सुरू असून, तात्काळ कामे पूर्ण करून दोन दिवसात सेंटर कार्यन्वित करून रुग्णांना दिलासा देण्याच्या सूचना आमदार पवार यांनी दिल्या. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना, तहसीलदार बी.ए. कापसे आदी उपस्थित होते.

आमदार पवार यांनी सांगितले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयांत कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट मंजूर झाला असून, त्याची निविदा काढण्यात आली आहे. महिनाभरात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित होणार आहे. सुरगाणा, अभोणा, बाऱ्हे येथील प्लांटही कार्यान्वित करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद परदेशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील, डॉ. प्रल्हाद चव्हाण, डॉ. दीपक बहिरम, डॉ. पराग पगार, डॉ. विलास चव्हाण, डॉ. बंगाळ आदी उपस्थित होते.

इन्फो

ऑक्सिजनचा प्रश्न सोडवणार

गोपाळखडी येथील कोविड केअर सेंटरला आमदार पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी मीना, तहसीलदार कापसे यांनी भेट देऊन पाहणी केली. कोविड सेंटरमध्ये सध्या निर्माण होणाऱ्या ऑक्सिजन सिलिंडरचा प्रश्न सोडविण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी स्वतः लक्ष घालून प्रश्न सोडविणार असल्याचे यावेळी सांगितले.

फोटो - ०४ कळवण

कळवण उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरची पाहणी करताना आमदार नितीन पवार. समवेत सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना, तहसीलदार बी.ए. कापसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद परदेशी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे आदी.

===Photopath===

040521\04nsk_47_04052021_13.jpg

===Caption===

 फोटो - ०४ कळवण  कळवण उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरची पाहणी करतांना आमदार नितीन पवार. समवेत सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना,  तहसीलदार बी. ए. कापसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद परदेशी,  राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे आदी.