लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतून चोरट्यांनी २३ हजार रुपये किमतीची झिंक व कॉपर वायर चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि़२१) रात्रीच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे सुरक्षारक्षकांनी आरडाओरड केल्यानंतर चोरट्यांनी दगडफेकही केली़कॉलेजरोडवरील डिसूझा कॉलनीतील रहिवासी मनोज अशोक कारवाल यांचा सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नं. ४८-४९ मध्ये गोविंदसन प्लाझा लाइट इंडस्ट्रीज प्रा. लि. नावाचा कारखाना आहे. बुधवारी रात्री चोरट्यांनी कारखान्यातील शौचालयाची खिडकी तोडून कंपनीत प्रवेश केला. या चोरट्यांनी कंपनीतील २३ हजार १८१ रुपये किमतीची ४८ किलो वजनाची झिंक आणि कॉपर वायर चोरून नेली़ कंपनीचे सुरक्षा रक्षक रूद्रप्रताप सिंग यांना चोरट्यांची कुणकुण लागताच त्याने आरडाओरड केला असता चोरट्यांनी सिंग व त्याच्या सहकारी सुरक्षारक्षकांच्या दिशेने दगडफेक करून पलायन केले़ याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातपूरच्या कंपनीतून वायरची चोरी
By admin | Updated: June 24, 2017 17:46 IST