शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाइपलाइन फुटल्याने पाणी वाया

By admin | Updated: April 20, 2016 00:11 IST

दुष्काळात तेरावा महिना : जेलरोड येथील अपूर्वा कॉलनी मैदानावर साचले पाण्याचे तळे

 नाशिकरोड : जेलरोड शिवाजीनगर अपूर्वा कॉलनीच्या कोपऱ्यावर भूमिगत मोबाइल केबल टाकण्यासाठी ‘हॉरीझोन्टल ड्रील’ मशीनच्या साह्याने काम सुरू असताना पाण्याची पाइपलाइन फुटल्याने दोन तासांमध्ये लाखो लिटर पाणी वाया गेले. पाइपलाइन फुटल्याने शिवरामनगर व आजूबाजूच्या भागात पाण्याचे तळे साचले होते. जेलरोड इंदिरानगर गांधी पुतळ्यासमोरील श्रीरामनगर येथे वोडाफोन कंपनीच्या मोबाइलची भूमिगत केबल टाकण्यासाठी अत्याधुनिक हॉरीझोन्टल ड्रील मशीनच्या साह्याने सोमवारी दिवसभर काम करण्यात येत होते. लोखंडे यांच्या जागेतून भूमिगत केबल टाकताना शिवरामनगर अपूर्वा कॉलनीच्या कोपऱ्यावर अरूण कोल्हे यांच्या घरालगत रस्त्याच्या कडेने असलेल्या मनपाच्या ३०० एम. एम. व्यासाच्या पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन त्या अत्याधुनिक मशीनने फोडून टाकली. त्यामुळे पाइपलाइनला आरपार मोठा खड्डा पडला होता.लाखो लिटर पाण्याची नासाडीमनपाकडून नेहमीप्रमाणे मंगळवारी पहाटे ५.३० च्या सुमारास पाणीपुरवठा करण्यात आल्यानंतर अपूर्वा कॉलनीच्या कोपऱ्यावर फुटलेल्या पाइपलाइनमधून फार मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. पाण्याचा आवाज येऊ लागल्याने व पहाटे फिरण्यास गेलेल्या रहिवासी, महिलांच्या सदर बाब लक्षात येताच त्या ठिकाणी गर्दी गोळा झाली. मात्र रहिवाशांकडे पाणी गळती थांबविण्यासाठी किंवा वाचविण्या साठी कुठलीच उपाय योजना नसल्याने प्रारंभी चांगलाच गोंधळ निर्माण झाला. पहाटेच्या अंधुक अंधारात लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याने हलकासा उतार असलेल्या शिवरामनगर, अपूर्वा कॉलनी परिसरात सर्वत्र फार मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कोल्हे यांच्या घरासमोर मोकळ्या प्लॉटमध्ये परिसरातील रहिवासी आपली चारचाकी वाहने उभी करतात. त्या वाहनांचे जमिनीपासून ५-६ इंच टायर पाण्यात बुडाले होते. रहिवाशांनी सदर बाब नगरसेवक शैलेश ढगे यांना कळविताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाणीपुरवठ्याचे अधिकाऱ्यांना पाचारण केले. मात्र तोपर्यंत पहाटे साडेपाच वाजेपासून साडेसात वाजेपर्यंत लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली होती. पाणीपुरवठा अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी आल्यानंतर लागलीच त्या पाइपलाइनचा पाणीपुरवठा बंद केला. मात्र तोपर्यंत पावसाळ्यात साचत नाही इतके पाणी शिवरामनगर भागातील बंगल्याच्या आवारात साचले होते. त्यानंतर लागलीच त्या पाइपलाइनचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येऊन दुपारपर्यंत पूर्ण करण्यात आले. (प्रतिनिधी)