शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कामगार पॅनलचा दणदणीत विजय

By admin | Updated: October 11, 2015 00:13 IST

सर्व जागा जिंकल्या : सिक्युरिटी प्रेस एम्प्लॉईज सोसायटी निवडणूक

नाशिकरोड : इंडिया सिक्युरिटी प्रेस एम्प्लॉईज को-आॅप. सोसायटीच्या शनिवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कामगार पॅनलने सर्वच्या सर्व ११ जागांवर दणदणीत विजय संपादन करून आपला पॅनलचा धुव्वा उडविला. इंडिया सिक्युरिटी प्रेस एम्प्लॉईज को-आॅपरेटीव सोसायटीवर स्थापना झाल्यापासुन गेल्या ५६ वर्षापासून कामगार पॅनलची एकहाती सत्ता आहे. सर्वसाधारण गट -६ जागा, इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जाती, भटक्या जमाती प्रत्येकी १ जागा व महिला राखीव २ जागा अशा एकूण ११ जागांसाठी शनिवारी सकाळी ८ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानात ३०६७ मतदारांपैकी २९६९ (९६ टक्के) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. सायंकाळी ५ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणीमध्ये पहिल्यापासून कामगार पॅनलचे सर्व उमेदवार आघाडीवर होते.सोसायटीच्या निवडणुकीत सर्वसाधारण गटाच्या सहा जागांमध्ये जगदीश गोडसे (१८८८), ज्ञानेश्वर जुंद्रे (१८६५) रमेश जाधव (१७१७), भगवान मोरे (१३१६) गणेश काळे (१५९२), राजेंद्र चंद्रमोरे (१५८५), महिला राखीव दोन जागा - सुनंदा कडाळे (१३९७), मंगला खर्जुल (१४२०), इतर मागास प्रवर्ग- साहेबराव गाडेकर (१७५४), अनुसूचित जाती-जमाती - संदीप गांगुर्डे (१७३१), विमुक्त जाती-भटक्या जमाती- हिरामण आव्हाड (१७७४) मते मिळवून विजयी झाले, तर आपला पॅनलचे रामभाऊ जगताप (११३८), हरिभाऊ ढिकले (११८५), निवृत्ती ताजनपुरे (९४६), सतीश निकम (१०२४), किसन बोराडे (९५७), देवीदास साळवे (८००), सुनील ढगे (१११४), कृष्णा चंद्रमोरे (११३२), गोकूळ काकड (१०८०), नंदा उखाडे (७६०), सुनंदा गांगुर्डे (८५३) मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेश सानप यांनी काम बघितले. (प्रतिनिधी)