शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

विंगेतील कलावंतांनीही  जगवली मराठी रंगभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:32 IST

रंगभूमी ही के वळ लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांपुरतीच मर्यादित नसून नाट्यप्रयोग यशस्वी होण्यासाठी बॅकस्टेज अर्थात विंगेतील कलावंतांचीदेखील तेवढीच महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ध्वनीव्यवस्था, प्रकाशयोजना, नेपथ्य, रंगभूषा यांसह लेखन, दिग्दर्शन आणि कलावंतांचा अभिनय जुळून आला तर श्रोते तो नाट्यप्रयोग अक्षरश: डोक्यावर घेतात. सांघिक प्रयत्नांच्या या खेळात आणि रंगभूमी जगवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा पडद्यामागील कलावंत मात्र नेहमीच उपेक्षित राहत आला आहे.

स्वप्निल जोशी ।नाशिक : रंगभूमी ही के वळ लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांपुरतीच मर्यादित नसून नाट्यप्रयोग यशस्वी होण्यासाठी बॅकस्टेज अर्थात विंगेतील कलावंतांचीदेखील तेवढीच महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ध्वनीव्यवस्था, प्रकाशयोजना, नेपथ्य, रंगभूषा यांसह लेखन, दिग्दर्शन आणि कलावंतांचा अभिनय जुळून आला तर श्रोते तो नाट्यप्रयोग अक्षरश: डोक्यावर घेतात. सांघिक प्रयत्नांच्या या खेळात आणि रंगभूमी जगवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा पडद्यामागील कलावंत मात्र नेहमीच उपेक्षित राहत आला आहे. रंगभूमीला अनेक वर्षांची परंपरा लाभली असली तरीही बदलत्या काळानुसार त्यात अनेक बदल होत गेले. ज्याप्रमाणे तंत्रज्ञान बदलत गेले त्याप्रमाणे   लावंतांमध्येही बदल घडत गेले. हेच बदल रंगमंचावरही दिसू लागले. या बदलांचे स्वागत होत असले तरीही जुन्या तंत्रज्ञानाला रंगभूमीवर तेवढेच महत्त्व आहे. अनेक नाट्यगृहांमध्ये नवीन तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने जुन्याच तंत्रज्ञानानुसार काम करावे लागते. या क्षेत्रात येणाºया नवीन पिढीने मात्र नव्या तंत्रज्ञानाबरोबरच जुन्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. रंगभूमीचे यश हे सामूहिक यश असून, या सामूहिक यशात ध्वनीव्यवस्था, प्रकाश योजनाकार, नेपथ्यकार, रंगभूषाकार यांचाही तेवढाच महत्त्वाचा वाटा आहे. एरवी ही ‘बॅकस्टेज’ला असलेली मंडळी प्रकाशझोतात येत नसल्याने आजच्या ‘मराठी रंगभूमी दिनी’ त्यांच्याशी साधलेला संवाद आणि यातून उलगडत गेलेला रंगमंचाच्या स्थित्यंतराचा हा प्रवास बºयाच गोष्टी सांगून जातो. शेती सांभाळून रंगभूषा साकारायची असल्याने सुरुवातीला हौशी कलावंतांसाठीच काम करण्याचे ठरवले. ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर यांच्यासोबत काही काळ घालवल्याने या क्षेत्राबद्दल आवड निर्माण झाली. त्यावेळी रंगभूमीवर काम करणारे नेताजी भोईर, सतीश सामंत, नारायण देशपांडे ही फळी थांबल्याने नाशिकची रंगभूमी काही काळ विसावली. याच काळात सतीश सामंत यांनी बारकावे काढून मार्गदर्शन केले. सुरुवातीला कामात सुबकता नव्हती, चांगली फिनिशिंग जमत नसल्याने यानंतर काही काळ फक्त फिनिशिंगवरच लक्ष केंद्रित केले. आता दिग्दर्शक थेट काम थोपवू लागल्याने रंगभूमीचा विश्वास संपादन केल्यासारखे वाटते. पूर्वी नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. नाटक आणि तमाशाला एकाच तराजूत मोजले जायचे, परंतु याकडे दुर्लक्ष करत रंगभूमीसाठी माझे योगदान देतच राहिलो. या क्षेत्रात येणाºया नव्या पिढीकडे संघर्ष करण्याची तयारी असणे आवश्यक आहे.  - माणिक कानडे, रंगभूषाकार आज रंगभूमीवर येणाºया प्रत्येकाला त्या नाटकातील मुख्य भूमिका हवी आहे, त्या तुलनेने तंत्रज्ञानाकडे जाणारी पिढी मात्र घडताना दिसत नाही. पूर्वी सादर होणाºया अभिनयांमध्ये दम असायचा पण आता ‘कॉलर माईक’मुळे कलाकारांचे भावनिक आवभाव गायबच झाले आहेत. दूरचित्रवाणीवर प्रसारित होणाºया डेलिसोपमुळे आताच्या रंगभूमीचा प्रेक्षकदेखील बदलला आहे. सुरुवातीला आॅर्केस्ट्रातून साथसंगतीचे काम करायला सुरुवात केल्यानंतर रंगभूमीवर आलो. एकदा मित्राच्या कार्यक्रमात साउंड आॅपरेटर आलेला नव्हता तेव्हा ही भूमिका मी निभावली आणि तेव्हापासून स्वत:ला या कामात वाहून घेतले. साउंड सिस्टम म्हणजे काय हे अनेकांना माहीत नव्हते, परंतु आता याबाबत सगळ्यांना माहिती आहे. या क्षेत्राकडे आता आदरयुक्त भावनेने बघितले जाते. या क्षेत्रात बराच काळ संघर्ष करावा लागत असला तरीही संघर्षामुळेच यश मिळते आणि कलेच्या क्षेत्रात कुणीच परिपूर्ण नसते.  - पराग जोशी, ध्वनीव्यवस्था शाळेत असतानाच बालनाट्य करता करता या क्षेत्राबद्दल आपोआप आवड निर्माण होत गेली. बालनाट्याच्या प्रयोगादरम्यान शिक्षकांनी रंगमंचावर खुर्च्या कशा लावाव्यात, टेबल कसे ठेवावेत यासारख्या बारीकसारीक गोष्टी शिकवल्या. चित्रकलेचे शिक्षक त्याकाळी सेट बनवत असत. त्याकाळी वापरण्यात येणाºया ग्लॉझच्या पडद्यांमुळे रंगमंच अधिकच खुलून दिसत असे त्यामुळे नेपथ्य आणि प्रकाश योजनेबद्दल अधिक आवड निर्माण होत गेली. तंत्रज्ञानाचा विचार करता आज सगळे काही उपलब्ध आहे. पूर्वी पडदे कापडाच्या सहाय्याने खळ लावून रंगवले जात, पण आता हे आता रेडिमेड उपलब्ध आहे. हल्ली हे सगळे बॅनरमुळे सहज शक्य असले तरीही यामुळे रंगमंच अधिक भंपक वाटतो, त्यात जिवंतपणा येत नाही.  - ईश्वर जगताप, नेपथ्यकार