शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मद्य विक्रेत्यांचा धीर सुटला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:24 IST

शहरातून जाणाºया राष्टÑीय व राज्य महामार्गावरील मद्य विक्रीच्या दुकानांना डिसेंबर महिन्यात दिलेला निकाल लागू नाही, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने देऊन आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी, शासन पातळीवर त्याची अंमलबजावणी करण्याबाबत कोणतीही पावले उचलली जात नसल्याने मद्य विक्रेत्यांचा धीर सुटत चालला असून, न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी शासनाविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याची तयारी त्यांनी चालविली आहे.

नाशिक : शहरातून जाणाºया राष्टÑीय व राज्य महामार्गावरील मद्य विक्रीच्या दुकानांना डिसेंबर महिन्यात दिलेला निकाल लागू नाही, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने देऊन आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी, शासन पातळीवर त्याची अंमलबजावणी करण्याबाबत कोणतीही पावले उचलली जात नसल्याने मद्य विक्रेत्यांचा धीर सुटत चालला असून, न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी शासनाविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याची तयारी त्यांनी चालविली आहे.सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर १६ मध्ये एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान राष्टÑीय व राज्य महामार्गावर पाचशे मीटर अंतरावर असलेल्या सर्व प्रकारच्या मद्य विक्रीचे परवाने १ एप्रिलनंतर नूतनीकरण न करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी १ एप्रिल २०१७ पासून देशपातळीवर करण्यात आली. त्यात नाशिक जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के मद्य विक्रेत्यांवर गंडांतर आले. या निर्णयामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट, परमिट रूम बिअर बारवर केलेली कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक मातीमोल होऊन हजारो कारागीर बेरोजगार झाले. त्यामुळे मद्य विक्रेत्यांनी राष्टÑीय व राज्य महामार्गावर असलेले परवाने शहराच्या मध्यवस्तीत स्थलांतर करण्याचे प्रयत्न सुरू केले असता जागोजागी नागरिकांनी केलेल्या विरोधाने हा प्रयत्नही बारगळला. दरम्यान, यासंदर्भात चंदीगढच्या व्यावसायिकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने त्या संदर्भात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने शहरातून जाणाºया राष्टÑीय व राज्य महामार्गासाठी न्यायालयाचा डिसेंबरचा आदेश लागू राहणार नाही, असे निर्देश ११ जुलै रोजी दिले. यासंदर्भात सोमवारीच नाशिकच्या हॉटेल्स अ‍ॅण्ड बार असोसिएशनने उत्पादन शुल्क अधीक्षकांना निवेदन देऊन न्यायालय आदेशाची अंमलबजावणी करण्याची विनंती केली. तथापि, हा सर्वस्वी अधिकार शासनाचा असल्याचे सांगून राज्य उत्पादन शुल्क विभागाने हतबलता व्यक्त केली. एकीकडे दररोज लाखो रुपयांचे होत असलेले व्यावसायिक नुकसान तर दुसरीकडे शासनाकडून केल्या जात असलेल्या दुर्लक्षामुळे मद्य विक्रेते हैराण झाल्याने त्यावर अखेरचा पर्याय म्हणून आता त्यांनी शासनाविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.