शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मंडळांना परवानग्यांसाठी एक खिडकी : महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:07 IST

नाशिक : महापालिकेच्या वतीने शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक महापौर रंजना भानसी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी, महापौरांनी गणेश मंडळांना विविध परवानग्यांसाठी मनपात एक खिडकी योजना कार्यान्वित करण्याचे प्रशासनाला आदेशित केले शिवाय, जेथे गरज भासेल तेथे कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्याचेही निर्देश देत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मंडळांना केले. दरम्यान, बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांनी विविध सूचनांचा वर्षाव केला.

नाशिक : महापालिकेच्या वतीने शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक महापौर रंजना भानसी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी, महापौरांनी गणेश मंडळांना विविध परवानग्यांसाठी मनपात एक खिडकी योजना कार्यान्वित करण्याचे प्रशासनाला आदेशित केले शिवाय, जेथे गरज भासेल तेथे कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्याचेही निर्देश देत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मंडळांना केले. दरम्यान, बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांनी विविध सूचनांचा वर्षाव केला.मनपाच्या अभिलेख कक्षात झालेल्या बैठकीत शहरातील विविध मंडळांच्या पदाधिकाºयांनी सूचना केल्या. त्यात वीज वितरण कंपनीकडून लवकर अनामत रक्कम परत मिळावी, सदर अनामत रक्कम कमी करावी, मिरवणूक मार्गावरील अडथळा ठरणारे विजेचे खांब काढावेत, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, निर्माल्य कलश वाढवावे, परवानग्यांसाठी एक खिडकी योजना राबवावी आदी विविध समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी महापौर रंजना भानसी यांनी सांगितले, महानगरपालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गावरील विविध समस्या सोडण्याचा दृष्टीने उपाययोजना करण्यात येईल. मंडळांना परवानग्यांसाठी तत्काळ एक खिडकी योजना कार्यान्वित केली जाईल.गणेश उत्सव काळात निर्माल्य संकलनासाठी मनपातर्फेजादा निर्माल्य कलश वाढविण्यात येईल. स्वछतेबाबत विशेष काळजी घेतली जाणार असून गोदावरी नदीचे प्रदूषण कमी होण्याची दृष्टीने कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहनही महापौरांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन गोपीनाथ हिवाळे यांनी केले. बैठकीला पदाधिकारी व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.