शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

टेबलखालील शिक्षकांचाही शोध घेतला जाईल काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:18 IST

डॉ. वैशाली झनकर यांच्या लाच प्रकरणाने शिक्षण क्षेत्राला बदनामीचा कलंक लागला हे नाकारता येणारे नाही. हा कलंक पुसण्यासाठी शिक्षण ...

डॉ. वैशाली झनकर यांच्या लाच प्रकरणाने शिक्षण क्षेत्राला बदनामीचा कलंक लागला हे नाकारता येणारे नाही. हा कलंक पुसण्यासाठी शिक्षण विभागाला आता काही कठोर पावले उचलावी लागणार आहेत. यापूर्वीही वेगवेगळ्या पदावरील अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याची उदाहरणे आहेत. परंतु, अधिकाऱ्यांवर कारवाईनंतर त्यांना पुन्हा समकक्ष पदस्थापना मिळाल्याने शिक्षण विभागातील अधिकारी आणखीनच निडर झाले आहेत. त्यामुळे राजरोजपणे लाखोंची रक्कम स्वीकारण्यापर्यंत अधिकारी आणि त्यांच्या साथीदारांची मजल गेली हे नाकारता येणार नाही. या भ्रष्टाचारी वृत्तीला वेळीच लगाम लावण्याचे आ‌व्हान शिक्षण विभागाला पेलावे लागणार आहे. या भ्रष्टाचाराची सुरुवात पात्रताधारकांच्या बेरोजगारीमुळे संस्थास्तरावरूनच सुरू होते. सुरुवातीला पात्रताधारकांकडून मानधनावर अथवा सेवाभावातून काम करून घेत मोठी रक्कम स्वीकारून शिक्षण संस्थांकडून शिक्षकांना रुजू करून घेतले जाते. त्यानंतरही वेतनमान्यता मिळविण्यासाठी संबंधित शिक्षकांना अशाप्रकारे मोठ्या रकमांची लाच द्यावी लागते. लाचखोरीला बळी पडणारे हे शिक्षक भविष्यातील प्रामाणिक पिढी घडवू शकतील का ? याविषयी शिक्षण विभागाने आत्मचिंतन करण्याची ही वेळ आहे. म्हणूनच वैशाली झनकर यांनी अशाप्रकारे आणखी किती शिक्षकांना अथवा शाळांना मान्यता दिल्या आहेत. त्यांना शोधून त्यांच्यावरही कारवाई करीत शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीकोनातून पाऊल उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

संघटनांमधील त्या दलालांचे काय?

शिक्षण विभागात लाचखोरी बोकाळण्यास दलाली करणारे काही शिक्षक पुढारीही कारणीभूत असल्याचा सूर आता विविध शिक्षक संघटनांमधूनही उमटू लागला आहे. अशा दलालांवर काय कारवाई होणार ? याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष आहे. तसेच लाचखोर शिक्षणाधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबतच असे शिक्षकही शोधून त्यांच्यावरही कारवाई करतानाच त्यांच्या मालमत्तांची, आणि कार्यभाराचीही चौकशीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

- नामदेव भोर