शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

...मंत्र्यांना फिरू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:38 IST

जायखेडा : सरकारने त्वरित दुष्काळ जाहीर न केल्यास आणि कांद्याची नुकसानभरपाई न दिल्यास एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

ठळक मुद्दे राजू शेट्टी : उत्राणे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मेळावा

जायखेडा : सरकारने त्वरित दुष्काळ जाहीर न केल्यास आणि कांद्याची नुकसानभरपाई न दिल्यास एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला.बागलाण तालुक्यातील उत्राणे येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, महिला आघाडी अध्यक्ष रसिका ढगे, उपाध्यक्ष डोंगर पगार, राज्य प्रवक्ते संदीप जगताप, तालुकाध्यक्ष पंढरीनाथ अहिरे, उत्राणेच्या सरपंच सुवर्णा पगार आदी उपस्थित होते.याप्रसंगी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर सडकून टीका करीत शेट्टी यांनी राज्य व केंद्र सरकारचा समाचार घेतला. देशातील २०३ संघटना एकत्र येऊन अखिल भारतीय किसान संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देणारे दोन विधेयक तयार करण्यात आले असून, विशेष अधिवेशन बोलावून त्यांचे कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी २८, २९ व ३० नोव्हेंबरला दिल्ली येथे आंदोलन केले जाणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांनी शेतकºयांचे प्रश्न व त्यावरील उपाय योजनांसंदर्भात मार्गदर्शन केले.निफाड, रानवडसाठी पॅकेजची मागणीसायखेडा: निफाड आणि रानवड कारखान्याला स्वतंत्र पॅकेज द्यावे, सभासद आणि कामगारांचे थकीत पैसे सरकारने त्वरीत द्यावेत. तसेच कांद्याला दोन हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली. करंजगाव येथे कांदा, ऊस,द्राक्ष परिषद गुरूवारी शेट्टी यांच्या उपस्थितीत झाली.यावेळी व्यासपीठावर प्रदेश अध्यक्ष रवींद्र पोकळे, युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष हंसराज वडघुले, महिला आघाडीच्या अध्यक्ष रसिका ढगे, करंजगावच्या सरपंच सोनाली राजोळे उपस्थित होते.विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी चालविण्यासाठी घेतलेल्या रानवड साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद, कामगार यांचे कोटी रु पये थकवले आहेत.त्यांना जाब कोण विचारणार? असा प्रश्नही शेट्टी यांनी उपस्थित केला.परिषदेतील ठरावकांद्याच्या निर्यातीबाबत सकारात्मक धोरण अवलंबावे.पणन महामंडळाने द्राक्ष उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी व्यापाºयांवर बंधने घालावीत.जगातील बहुतांशी देशात द्राक्ष निर्यात खुली करावी. द्राक्षावर आधारित पूरक व्यवसाय सुरू करावे.