शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

संपामुळे मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन कापणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 00:39 IST

नाशिक : मुळात केंद्र शासनाच्या विरोधातील आंदोलन त्यात महापालिकेच्या प्रश्नांवर कामगार कर्मचारी कृती समितीने संप पुकारला आणि ऐन स्वच्छ ...

ठळक मुद्देकारवाईची शक्यता : सहभागी कर्मचाऱ्यांची आयुक्त गमे माहिती घेणार

नाशिक : मुळात केंद्र शासनाच्या विरोधातील आंदोलन त्यात महापालिकेच्या प्रश्नांवर कामगार कर्मचारी कृती समितीने संप पुकारला आणि ऐन स्वच्छ सर्वेक्षणाच्या कालावधीत सफाई कामगारदेखील संपात सहभागी झाल्याने महापालिकेला धक्का बसला. आता राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्याची तयारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सुरू केली असून, काम नाही तर वेतन नाही या निर्देशाप्रमाणे कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन कापले जाण्याची शक्यता आहे.देशपातळीवर पुकारण्यात आलेला कामगार कर्मचाºयांचा संप हा केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात होता. महापालिकेतील कर्मचाºयांचे प्रश्न स्थानिक आणि फार तर राज्य शासनाशी संबंधित होते. त्यामुळे आंदोलन करू नये, अशी भूमिका महापालिकेने घेतली. आयुक्त गमे यांनी तर सध्या स्वच्छ शहर सर्वेक्षण होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारचे पथक कोणत्याही क्षणी येऊ शकते. त्यामुळे संपात सहभागी होऊ नये, असे आवाहन संघटनेचे लोकप्रतिनिधी असलेल्या नेत्यांना केले होते. परंतु उपयोग झाला नव्हता, असे त्यांनी सांगितले. संपाबाबत राज्य शासनानेच निर्देश असून त्यानुसार संपात सहभागी झालेल्यांवर काय कारवाई हे अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.अत्यावश्यक सेवेबाबत संभ्रमसफाई कामगारांची सेवा तसेच घंटागाड्यांचे कामगार या अत्यावश्यक सेवेत येतात काय याबाबत महापालिकेच्या परसेवेतून आलेल्या अधिकाºयांमध्ये संभ्रम आहे. काहींनी ही सेवा अत्यावश्यक आहे तर काहींनी नाही, असे सांगितले. तथापि, त्याबाबत कोणीही स्पष्ट सांगू शकले नाही. संबंधितांवर कारवाई करण्याबाबतदेखील आयुक्तच निर्णय घेतील, असे सांगून संबंधित अधिकाºयांनी स्वत:ची सोडवणूक करून घेतली.

टॅग्स :Strikeसंप