शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वि-किरण प्रकल्पातून आंब्याची निर्यात थांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 22:41 IST

कोरोनाच्या संकटामुळे येथील डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषक वि-किरण प्रकल्पातून कोकणचा राजा हापूस आंबा यावर्षी अमेरिका व आॅस्ट्रेलियाला रवाना होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकल्पात लॉकडाउनमुळे कामकाज बंद आहे.

ठळक मुद्देप्रश्नचिन्ह : कोरोनामुळे लासलगावी केंद्राचे कामकाज ठप्प

लासलगाव : कोरोनाच्या संकटामुळे येथील डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषक वि-किरण प्रकल्पातून कोकणचा राजा हापूस आंबा यावर्षी अमेरिका व आॅस्ट्रेलियाला रवाना होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकल्पात लॉकडाउनमुळे कामकाज बंद आहे.मागील वर्षी १० एप्रिलपाासून आंब्याची निर्यात लासलगावमार्गे सुरु झालेली होती. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या आंब्याची अमेरिका त्यानंतर आॅस्ट्रेलियाला वारी सुरू झाली होती. लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या वि-किरण प्रकल्पात प्रक्रिया करून गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत आंब्याची निर्यात सुरू आहे. आॅस्ट्रेलियन मार्केटमध्येही त्याची सुरूवात झालेली होती. दरवर्षी साधारणत: एप्रिल ते जुलै या कालावधीत लासलगावच्या या केंद्रात वि-किरण प्रक्रि या केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून कृषकच्या माध्यमातून ही प्रक्रि या पार पाडली जात होती. भाभा अणुसंशोधन केंद्राशी केलेला करार संपुष्टात आल्यामुळे हा प्रकल्प मुंबईच्या अ‍ॅग्रो सर्च या कंपनीने भाडेतत्त्वावर घेतला आहे. फळमाशीच्या प्रादुर्भावाचे कारण सांगत युरोपीय महासंघाने भारताच्या हापूस आंब्यावर २०१३ मध्ये बंदी घातली होती. त्यानंतर अमेरिकेला पाठविण्यात येणाºया हापूस आंब्यावर लासलगाव येथे वि-किरण प्रक्रि या केली जाते. लासलगाव येथे ३१ आॅक्टोबर २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलिबहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या कृषी उत्पादन संशोधन केंद्र येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र, येथे आता फक्त आंब्यावर वि-किरण करून तो निर्यात केला जात आहे. अमेरिकेला जाणाºया आंब्यामध्ये हापूस, केशर, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतीय हापूस आंब्याने लासलगाव मार्गे अमेरिकेला पोहोचला होता. दरवर्षी साधारणत १८ एप्रिल ते २० जून या कालावधीत लासलगावच्या या केंद्रात विकिरण प्रक्रिया केली जाते. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे कामकाजच बंद असल्याने यंदा हापूस आंबा अमेरिका, आॅस्ट्रेलिया वारी करणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.वि-किरण प्रक्रिया म्हणजे ?लासलगावच्या केंद्रात गॅमा किरणांचा ४०० ते ७०० ग्रे मात्रा वि-किरण मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढवली जाते. यामुळे आंबा पिकण्याची क्रि या तर लांबतेच, शिवाय कोयीतील कीडही नष्ट होते. आंब्यातील साका (सफेद गाठ) निर्मितीची प्रक्रि याही थांबते. कीड रोखण्यास हा अतिशय चांगला उपाय मानला जातो. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रि या होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते.

टॅग्स :MangoआंबाAgriculture Sectorशेती क्षेत्र