शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

जमीन अधिग्रहणात शेतकऱ्यांचे हित पाहणार

By admin | Updated: August 4, 2014 02:12 IST

जमीन अधिग्रहणात शेतकऱ्यांचे हित पाहणार

 

नाशिक : कुंभमेळ्यासाठी जमीन अधिग्रहित करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, तसेच त्यांना योग्य मोबदला मिळून त्यांचे हित साधले जाईल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्याचे महंत ग्यानदास महाराज यांनी सांगितले़ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाजवळील शासकीय विश्रामगृहावर कुंभमेळ्याच्या आयोजनाबाबत महंत ग्यानदास यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली़ या चर्चेत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन व योग्य मोबदला देऊन जमिनी अधिग्रहित करण्यात याव्यात़ केंद्र शासनाने उज्जैन येथे भरलेल्या कुंभमेळ्यासाठी ११०० कोटी रुपयांचा निधी दिला होता़ त्याप्रमाणे नाशिकला अतिरिक्त दोन हजार कोटी निधी केंद्र शासनाने देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. हरिद्वार, उजैन्न, अलाहाबाद याप्रमाणे कुंभमेळा प्राधिकरण नाशिक येथे स्थापन करण्याची मागणी ग्यानदास महाराजांनी केली़ याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले़ नदीची स्वच्छता व शहराचे सौंदर्यीकरण तातडीने करावे यांसह विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली़ यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे आश्वासन दिल्याचे महंत ग्यानदास महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़ याप्रसंगी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कॉँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रभारी मोहन प्रकाश, स्वामी भक्तिचरण दास, संजय दास, हेमंत दास, उद्योजक धनंजय बेळे, शरद अहेर, पंकज काळे, जिल्हाधिकारी विलास पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, महापालिका आयुक्त संजीवकुमार आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)