शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शहाणपण देगा देवा...

By admin | Updated: December 9, 2015 00:12 IST

बालनाट्य : ‘प्रबोधिनी’च्या बाल कलावंतांचा कलाविष्कार

नाशिक : मानवाकडून निसर्गाची विविध मार्गाने हानी केली जात आहे. त्यामुळे नैसर्गिक प्रकोपाचा सामना करण्याची वेळ सजीवसृष्टीवर अनेकदा येते. बिघडलेल्या निसर्गचक्राच्या संतुलनाला माणूसच जबाबदार असल्याचे मुक्या प्राण्यांचे पात्र रंगविणाऱ्या ‘प्रबोधिनी’च्या बाल कलाकारांनी नाट्यमय संघर्षातून रंगमंचावर पटवून देण्याचा प्रयत्न केला.सांस्कृतिक संचलनालयाच्या वतीने सुरू असलेल्या तेराव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या दिवशी बाल कलावंतांची एकूण पाच नाटके सादर झाली. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असलेल्या स्पर्धेदरम्यान, सकाळी पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्राजक्ता पंचाक्षरी लिखित व दिग्दर्शित ‘पंखातील आभाळ’ हे नाटक सादर केले. यामध्ये निकीता काकळीज, तेजस्विनी ठाकरे, शिवानी व्यवहारे, साधना रणमाळ, साक्षी पवार, वेदश्री गडाख आदिंच्या भूमिका होत्या. यानंतर प्रबोधिनी विद्यामंदिराच्या गतिमंद विद्यार्थ्यांनी ‘शहाणपण देगा देवा’ या नाटकातून निसर्गावर मानवाचा विविध मार्गाने होणारा हल्ला व त्यानंतर येणारी नैसर्गिक आपत्ती यावर प्रकाशझोत टाकला. या नाटकाचे लेखन मनीषा नलगे व दिग्दर्शन रमेश वनीस यांनी केले. यामध्ये नवनीत वाघ, सौरभ साळुंके, हिमांशू गोस्वामी, निखील पवार, कौस्तुभ शर्मा, प्रतीक शिंदे, हर्ष जोशी आदिंच्या भूमिका होत्या.अहमदनगरच्या सप्तरंग थिएटर्सच्या वतीने ‘सर... तुम्ही गुरुजी व्हा’ हे नाटक सादर करण्यात आले. त्र्यंबक वडसकर लिखित व दीपक ओहोळ दिग्दर्शित या नाटकामध्ये आकांक्षा शिंदे, संस्कार गुंदेचा, श्वेता दरंदले, गायत्री आहोळ, गंधाली जोशी आदिंच्या भूमिका होत्या. भुसावळच्या अहल्यादेवी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘वीज पेरुया अंगात’ या नाटकाचे सादरीकरण केले. ज्ञानेश्वर गायकवाड लिखित व सोनाली वासकर दिग्दर्शित या नाटकात टिना नेमाडे, प्राची खरादे, धनश्री चौधरी, साक्षी भटकर, खिल्लेश्वरी सोनार, सीमरन तडवी आदिंनी विविध भूमिका साकारल्या. शेवगावच्या भारदे उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘अवताराची गोष्ट’ नाटकाचे सादरीकरण केले. यामध्ये मुग्धा घेवरीकर, साक्षी झोटिंग, प्रणव नागरगोजे, ऋषिराज दहिफळे आदिंच्या भूमिका होत्या. (प्रतिनिधी)