शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी जागांवरील फेरीवाला क्षेत्राबाबत अभिप्राय मागविणार

By admin | Updated: January 23, 2015 23:56 IST

फेरीवाला समिती : पुण्यापेक्षा निम्म्या दर आकारणीवर चर्चा

नाशिक : शहरातील सहा विभागांमध्ये ‘ना फेरीवाला’, ‘प्रतिबंधित फेरीवाला’ आणि ‘मुक्त फेरीवाला’ अशी तीन क्षेत्रे निश्चित करण्यात येणार असून, अशा क्षेत्रांमध्ये समाविष्ट होऊ शकणाऱ्या जागांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सरकारी जागांवरील ‘नो हॉकर्स झोन’बाबत संबंधित सरकारी यंत्रणांकडून अभिप्राय मागवून एकमताने निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. दरम्यान, फेरीवाला समितीच्या झालेल्या बैठकीत प्रतिनिधींनी पुण्यातील दराच्या पन्नास टक्के दर नाशिकला आकारण्याची सूचना आयुक्तांकडे केली.शहर फेरीवाला समितीची बैठक पहिल्यांदाच आयुक्त डॉ. गेडाम यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत जागांचे अ, ब, क, ड याप्रमाणे वर्गीकरण करून त्यानुसार दैनंदिन भाडे आकारणीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यात ‘अ’ प्लस वर्गासाठी २०० रुपये, ‘अ’ वर्गासाठी १५० रुपये, ‘ब’ वर्गासाठी १०० रुपये, ‘क’ वर्गासाठी ७५ रुपये आणि ‘ड’ वर्गासाठी ५० रुपये भाडे आकारणीचा प्रस्ताव होता. यावर प्रतिनिधींनी पुणे येथील क्षेत्रनिहाय दर आकारणीच्या पन्नास टक्के दर नाशिकमध्ये आकारण्याची मागणी केली. त्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. याचवेळी अस्तित्वातील सर्व फेरीवाल्यांची नोंदणी करणे, फेरीवाल्यांच्या व्यवसायाच्या कालावधीनुसार वर्गीकरण करणे, व्यावसायिकदृष्ट्या जादा उत्पन्नाच्या व महत्त्वाच्या जागांचे वर्गीकरण करणे, फेरीवाला झोनमध्ये सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना शासनाच्या नियमानुसार आरक्षण ठेवणे यावरही चर्चा झाली. हॉकर्स झोन निश्चित करताना वाहनतळांच्याही जागा निश्चित करण्याची सूचना प्रतिनिधींनी केली असून, त्यासंबंधी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. याचबरोबर आरटीओ, राष्ट्रीय महामार्ग, पोलीस आयुक्तालय, सिडको, एमआयडीसी, पाटबंधारे विभाग या सरकारी यंत्रणांमधील जागांवरील हॉकर्स झोनबाबतही संबंधितांकडून अभिप्राय मागविण्यात आले असल्याचे आयुक्तांनी सांगितले. बैठकीला उपआयुक्त दत्तात्रेय गोतिसे आणि फेरीवाला समितीचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)