नाशिक : पतीचे निधन झाल्याचे समजताच पत्नीने पडक्या विहिरीतील पाण्यात उडी घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना सातपूरच्या प्रबुद्धनगरमध्ये सोमवारी (दि़८) सकाळच्या सुमारास घडली़ मयत महिलेचे नाव सुमनबाई भास्कर गुंजाळ (५५, रा़ प्रबुद्धनगर, आम्रपाली चौक, सातपूर) असे आहे़ सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रबुद्धनगरमधील आम्रपाली चौकात सुमनबाई गुंजाळ (५५) या कुटुंबीयांसह राहतात़ त्यांच्या पतीचे निधन झाल्याचे त्यांना कळताच त्यांचा शोक अनावर झाला व त्यांनी पडक्या विहिरीतील पाण्यात उडी घेऊन आत्महत्त्या केली़ (प्रतिनिधी)
पतीच्या निधनानंतर पत्नीची आत्महत्त्या
By admin | Updated: August 10, 2016 01:02 IST