शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कशासाठी.. पोटासाठी : अल्पभूधारक शेतकऱ्याची शोकांतिका

By admin | Updated: July 23, 2016 22:51 IST

वृद्ध शेतकरी दाम्पत्य ओढते नांगर

 नाशिक : ट्रॅक्टर किंवा बैलाच्या साह्याने शेत नांगरणी करणेही परवडत नसल्याने एक वृद्ध दाम्पत्य चक्क स्वत: नांगर ओढत आहे. पोटापाण्यासाठी शेतीत राबणारे हे वृद्ध दाम्पत्य गेल्या काही वर्षांपासून बैल आणि आधुनिक साधनांशिवाय शेती करीत आहेत. शेती करण्यासाठी त्यांच्याजवळ बैलच नसल्याने त्यांना स्वत:लाच नांगराला जुंपून घ्यावे लागले आहे, तर दुसरीकडे ट्रॅक्टरच्या साह्याने शेती करणेही आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे टमाटे, भुईमूग यासारख्या पिकांसाठी या दाम्पत्याला शेतामध्ये बैलासारखे राबावे लागत आहे. साधारणपणे साठीच्या पुढे वयोमान असलेले हे भिंगराज गोपाल पालवी आणि त्यांच्या पत्नी शकुंतला हे दाम्पत्य बैलाच्या जागी स्वत:ला जुंपून नांगर ओढत असल्याचे पाहून त्यांच्या कठोर कष्टाची आणि मेहनतीची जाणीव होते. नाशिकपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावरील शिवनई गावच्या शिवारात हे अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्य शेतात राबत आहे. कुठल्याही साधनांची अपेक्षा न करता झेपेल आणि जमेल तेव्हढे ते नांगर ओढतात. पोटापाण्यासाठी हे करावेच लागते, असे ते कळवळून सांगतात. त्यांना कोणत्या शासकीय मदतीची किंवा कुणाच्या सहकार्याचीदेखील अपेक्षा नाही. त्यांनी आजच्या शेतकऱ्यांची दशा समाजाला कळू द्या, अशी भावना व्यक्त केली. आधुनिक पद्धतीच्या शेतीने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवल्याची आकडेवारी शासकीय पातळीवर दिली जात असली तरी अल्पभूधारक शेतकऱ्यांना मात्र अजूनही पारंपरिक पद्धतीनेच शेती करावी लागत असल्याचेच हे वास्तव आहे. शेतीची कामे आता आधुनिक पद्धतीने होऊ लागली आहेत. त्यामुळे बैलांचा वापर कमी झाला आहेच शिवाय दुष्काळी परिस्थितीमुळे बैलांचा सांभाळ करणेही कठीण झाल्यामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे. या शेतकऱ्याकडे बैल नसल्यामुळे आणि दुसऱ्याचे बैल किंवा ट्रॅक्टर भाड्याने आणणेही परवडत नसल्यामुळे हे दाम्पत्य स्वत:च नांगर ओढत आहेत. भुईमुगाचे पीक घेण्यासाठी आजोबा नांगर ओढतात, तर त्यांच्या पत्नी या पाठीमागून नांगर घेऊन चालवतात. पावसाच्या रिमझिम सरीत आणि मजल दर मजल करीत या दाम्पत्याने अर्ध्याहून अधिक शेत नांगरले आहे. भुईमुगाची लागवड करण्यासाठी भल्या पहाटे हे दाम्पत्य शेतावर येते आणि दिवसभर नांगर ओढत असते. या दाम्पत्याकडे पाहताना हे कुठल्या आदिवासी खेड्यापाड्यातील शेतकरी असावेत असेच वाटते. मात्र शहराच्या अगदी जवळ असूनही त्यांच्या नशिबी असा नांगर ओढणे आले आहे.