शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदाची लॉटरी कुणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:13 IST

इगतपुरी तालुक्यात २०२० ते २०२५ या मुदतीसाठी तालुक्यातील अनुसूचित क्षेत्र वगळता उर्वरित ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी येत्या २८ ...

इगतपुरी तालुक्यात २०२० ते २०२५ या मुदतीसाठी तालुक्यातील अनुसूचित क्षेत्र वगळता उर्वरित ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी येत्या २८ जानेवारीला पंचायत समिती सभागृहात बैठक होणार असून, त्यात आरक्षण निश्चित होणार आहे. इगतपुरी तालुक्यात एकूण ९६ ग्रामपंचायती असून, ६४ ग्रामपंचायती अनुसूचित क्षेत्रात आहेत तर, उर्वरित ३२ ग्रामपंचायती या अनुसूचित क्षेत्राबाहेरील आहेत. या अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित होणार आहे. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी, ओबीसी, सर्वसाधारण अशा प्रवर्गासाठी आरक्षण निघणार आहे

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती व अन्य संस्थांच्या निवडणुका असल्याने सरपंच पदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्या ग्रामपंचायतीत सरपंच पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार, आरक्षणानुसार सरपंचपद कुणाकडे जाणार, याबाबत अंदाज बांधले जात आहे. इगतपुरी तालुक्यात सध्या निवडणुका झालेल्या भरवीर खुर्द, शेणवड खुर्द व गरुडेश्वर ग्रामपंचायतीत नव्या आरक्षणानुसार सरपंच निवड होणार असल्याने या तीन पंचायतीत सरपंच पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्कंठा लागून राहिली आहे

इन्फो

या ग्रामपंचायतींचे ठरणार आरक्षण

वाडीव-हे., गोंदे दुमाला, माणिकखांब, मुंढेगाव, मुकणे, नांदूरवैद्य, साकूर, सांजेगाव, मुरंबी, भरवीर बु, कुर्हेगाव शेनीत, वाघेरे, मोडाळे, नांदगाव बु., समनेरे, कावनई, भरवीर खुर्द, बेलगाव कुर्हे, पिंपळगाव डुकरा, घोटी खुर्द, दौंडत, मालूजे, जानोरी, शिरसाठे, पाडळी, निनावी, पिंपळगाव घाडगा, लक्ष्मीनगर, कृष्णानगर, गरुडेश्वर, शेनवड खुर्द.