शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाला चार हजारत ‘स्मार्ट फोन’ कोण देईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 18:18 IST

केंद्रस्तरीय अधिका-यांना चार हजार रुपये किमतीचा ‘स्मार्ट फोन’ आयोग स्वखर्चाने घेऊन देणार आहे. नाशिक जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर दिंडोरी तालुक्याची त्यासाठी निवड करण्यात आली

ठळक मुद्देफेरनिविदेतही ‘स्मार्ट फोन’ला ठेकेदारांची ना-नास्मार्ट फोन घेण्यासाठी बारा लाखांची तरतूद

नाशिक : चार हजार रूपये किंमतीत ‘स्मार्ट फोन’ खरेदी करून तो मतदार याद्यांचे काम करणा-या केंद्रस्तरीय अधिका-यांना (बीएलओ) देण्यासाठी निवडणूक विभागाने मागविलेल्या फेर निविदेतही फक्त दोनच ठेकेदारांनी भाग घेतल्यामुळे पुन्हा तिस-यांदा निविदा मागविण्याची वेळ आली, त्यामुळे आता आयोगाने ३० नोव्हेंबर पर्यंत काम करण्यासाठी दिलेली मुदत वाढविली जाण्याची शक्यता आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या कामास सुरुवात केली असून, १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदार नोंदणीबरोबरच मतदारांची संपूर्ण माहिती गोळा करून ते निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला माहिती सादर करतील असे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी केंद्रस्तरीय अधिका-यांना चार हजार रुपये किमतीचा ‘स्मार्ट फोन’ आयोग स्वखर्चाने घेऊन देणार आहे. नाशिक जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर दिंडोरी तालुक्याची त्यासाठी निवड करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात दिंडोरीसाठी नेमण्यात आलेल्या सुमारे तीनशे केंद्रस्तरीय अधिका-यांना स्मार्ट फोन घेण्यासाठी बारा लाखांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक शाखेने आयोगाला अपेक्षित असलेले फीचर्स समाविष्ट असलेले ‘स्मार्ट फोन’ पुरविण्यासाठी जाहीर निविदा मागविल्या, परंतु स्मार्ट फोनसाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद अतिशय कमी असून, कोणतीही नामांकित कंपनी चार हजार रुपयंत ‘स्मार्ट फोन’ देऊ शकत नसल्याने निवडणूक शाखेच्या निविदेत फक्त दोनच निविदाधारक सहभागी झाले. नियमानुसार कोणत्याही ठेक्यासाठी कमीत कमी तीन निविदाधारक सहभागी होणे आवश्यक असल्याने जिल्हा निवडणूक शाखेला पुन्हा स्मार्ट फोनसाठी फेरनिविदा काढावी लागली आहे. शुक्रवारी या निविदा उघडण्यात आल्या मात्र त्यातही दोघांनीच भाग घेतल्यामुळे आता तिस-यांदा निविदा मागविण्यात येणार आहे. परिणामी आयोगाने दिलेली ३० नोव्हेंबरच्या आत मतदार याद्यांचे अद्यावतीचे कामकाज पुर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे या कामाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय