शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मतांवर कोणाचा डल्ला?

By admin | Updated: February 12, 2017 00:30 IST

सेना-भाजपाची नजर : मागील निवडणुकीत २८ टक्के मते

नाशिक : सन २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेचे इंजिन सुसाट धावले आणि चाळीस जागा पदरात पडण्याबरोबरच मतांच्या टक्केवारीतही अव्वल ठरले होते. मनसेच्या इंजिनला लागलेल्या चाळीस डब्यांपैकी ३० डबे पळवून नेणाऱ्या सेना-भाजपाची आता मनसेने मागील निवडणुकीत मिळविलेल्या तब्बल २८.२३ टक्क्यांवर नजर पडली असून, दोहोंसह अन्य पक्षांमधूनही कोण किती मनसेच्या मतांवर डल्ला मारतो, हे २३ फेबु्रवारीला समोर येणार आहे. मागील महापालिका निवडणुकीत द्विसदस्यीय प्रभाग रचना होती. या निवडणुकीसाठी १० लाख ३ हजार मतदार होते. त्यातील ५ लाख ७२ हजार आठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एका मतदाराला दोन मते देण्याचा अधिकार असल्याने एकूण वैध मतांची संख्या ११ लाख ४४ हजार १६ इतकी होती. या वैध मतांमधून मनसे सर्वाधिक ३ लाख २३ हजार ४२ मते मिळून सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला होता. मनसेच्या एकूण मतदानाची टक्केवारी २८.२३ इतकी होती. त्याखालोखाल शिवसेनेला १७.७३ टक्के मते मिळाली होती. शिवसेनेपेक्षा एक जागा मिळूनही राष्ट्रवादीची मात्र मतांची टक्केवारी शिवसेनेपाठोपाठ १३.५१ टक्के इतकी राहिली. कॉँग्रेसने ११.९६ टक्के, भाजपाने ११.५० टक्के, माकपाने १.२० टक्के, भाकपाने ०.०१ टक्का, बसपाने ०.७९ टक्के, समाजवादी पक्षाने ०.०६ टक्के मते मिळविली होती. अपक्ष उमेदवारांनी १२.०४ टक्के मते घेतली होती. जनराज्य आणि रिपाइंमिळून मतांची टक्केवारी २.५५ टक्के राहिली. आता पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. सत्ताधारी मनसेची अवस्था शोचनीय बनली आहे. मनसेच्या ४० नगरसेवकांपैकी तब्बल ३० नगरसेवक सेना-भाजपात गेले. मागील निवडणुकीत मनसेकडे झुकलेला सुमारे २८ टक्के मतदार आता नेमका कुणाकडे झुकतो, हे येत्या २३ फेबु्रवारीला मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. मनसेपासून दुरावलेला मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी प्रामुख्याने सेना-भाजपात स्पर्धा लागणार आहे. मनसेने यंदा १२२ पैकी १०३ उमेदवार दिले आहेत. त्यात मनसेच्या विद्ममान महापौरांसह आठ नगरसेवकांचा समावेश आहे. यंदा मनसेच्या पारड्यात किती मतदान पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.