शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

फुटिरांसाठी पक्षांचा ‘व्हिप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2016 00:25 IST

प्रभाग सभापती : नाशिकरोड, सिडको, सातपूरसाठी आज निवडणूक

 नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणाऱ्या आणि काही कुंपणावर असलेल्या फुटिरांची कोंडी करण्यासाठी मंगळवारी (दि.१२) होणाऱ्या प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीकरिता सर्वच राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेतली असून, अधिकृत उमेदवारालाच मतदान करण्यासंबंधी सदस्यांना ‘व्हिप’ बजावला जाणार आहे. दरम्यान, मंगळवारी नाशिकरोड, सिडको आणि सातपूर प्रभाग सभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.मंगळवारी सकाळी १०.३० वाजता सातपूर, दुपारी १२ वाजता सिडको आणि ४ वाजता नाशिकरोड प्रभाग समिती सभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांत पक्षांतराचे जोरदार वारे वाहत असल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रामुख्याने सत्ताधारी मनसेला मोठ्या प्रमाणावर खिंडार पडले असून, आतापर्यंत ३९ पैकी १२ नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकलेला आहे. याशिवाय, कॉँग्रेस, माकपा आणि राष्ट्रवादीलाही बंडखोरीची लागण झालेली आहे. मनसेचे नाशिकरोड येथील नगरसेवक नीलेश शेलार व शोभना शिंदे यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेश झुगारून मतदान केले शिवाय सेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेच्या तक्रारीनंतर विभागीय आयुक्तांनी दोहोंचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याचा नुकताच निकाल दिलेला आहे. या अपात्रतेच्या कारवाईचा बंडखोरांनी धसका घेतला आहे. दि. १२ व १३ रोजी होणाऱ्या प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेसह सर्वच पक्ष आपल्या सदस्यांना व्हिप बजावणार असून, त्यामुळे फुटिरांची कोंडी होणार आहे. सातपूर प्रभागात माकपाच्या नंदिनी जाधव यांनी सेनेत, तर सचिन भोर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सिडको प्रभागात मनसेचे अरविंद शेळके व रत्नमाला राणे यांनी सेनेत प्रवेश केला आहे, तर जनराज्य आघाडीचे दोन सदस्य यापूर्वीच भाजपात दाखल झालेले आहेत. नाशिकरोड प्रभागात मनसेचे शोभना शिंदे व नीलेश शेलार यांना अपात्र घोषित करण्यात आल्याने त्यांना मतदानात भाग घेता येणार नाही.