शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेशनचे धान्य ठेवायचे कोठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:22 IST

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत राबविण्यात आलेल्या रेशनच्या धान्य वितरणासाठी ईपीडीएस प्रणालीचा गेल्या दोन महिन्यांपासून सक्तीने वापर सुरू झाल्यामुळे रेशन दुकानदारांकडे मोठ्या प्रमाणावर धान्य वाटपाविना शिल्लक राहिल्याने त्यातच शासनाने जून महिन्याचे धान्य चालू महिन्यातच उचलण्याचा तगादा लावल्याने धान्य ठेवायचे कोठे, असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे.

नाशिक : सार्वजनिक वितरण व्यवस्थेत राबविण्यात आलेल्या रेशनच्या धान्य वितरणासाठी ईपीडीएस प्रणालीचा गेल्या दोन महिन्यांपासून सक्तीने वापर सुरू झाल्यामुळे रेशन दुकानदारांकडे मोठ्या प्रमाणावर धान्य वाटपाविना शिल्लक राहिल्याने त्यातच शासनाने जून महिन्याचे धान्य चालू महिन्यातच उचलण्याचा तगादा लावल्याने धान्य ठेवायचे कोठे, असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे. दुसरीकडे रेशन दुकानदारांकडे सलग तीन महिने धान्य शिल्लक राहिल्यास त्यांचा धान्याचा कोटा कमी करण्याच्या हालचाली पुरवठा खात्याने सुरू केल्या आहेत.गेल्यावर्षी पॉस यंत्राच्या सहाय्याने दुकानदारांना धान्याचे वाटप करण्याची सक्ती शासनाने केली असली तरी, अजूनही शिधापत्रिकाधारकांची डाटा एंट्री व आधार कार्ड जोडणीचे काम सुरूच आहे. अशा परिस्थितीत ज्या शिधापत्रिकाधारकाला पॉस यंत्राच्या सहाय्याने धान्य मिळत नव्हते त्यांना मॅन्युएल धान्य वाटप करण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु १ एप्रिलपासून राज्य सरकारने ईपीडीएस प्रणालीचा सक्तीने वापर सुरू करून पॉस यंत्राचा वापर करूनच धान्याचे वाटप करण्यास सुरुवात केली. परिणामी डाटा एंट्री व आधार जोडणी न झालेल्या शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. तथापि, जिल्ह्यात एप्रिल महिन्यात जवळपास ७२ टक्के धान्याचे वाटप ईपीडीएस प्रणालीचा वापर करून करण्यात आले, तर नाशिक शहरात मात्र हे प्रमाण ६२ टक्क्यांवरच थांबले आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांकडे एप्रिल महिन्याचे धान्य पडून असताना मे महिन्याच्या धान्याची उचल करावी लागली आहे. त्यामुळे त्यांची दुकाने अन्नधान्याने  ‘फुल्ल’ झाली असून, धान्य ठेवायचे कोठे? असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे. अशा परिस्थितीत जून महिन्याच्या धान्याची उचल मे महिन्यातच करावी असा फतवा अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने काढला आहे. त्यामुळे पुरवठा विभागाने दुकानदारांना जून महिन्याचे धान्य उचलण्यासाठी चलने भरण्याचा तगादा लावला आहे; परंतु दुकानात धान्य ठेवण्यास जागा नाही, अन्यत्र दुसरीकडे कोठे ठेवल्यास थेट गुन्हा दाखल होण्याची कायद्यात तरतूद असल्यामुळे उचललेले धान्य दुसरीकडे ठेवताही येत नसल्याने दुकानदार अडचणीत सापडले आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय