शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कुठे रुग्ण ॲम्ब्युलन्समध्येच; तर कुणाला मिळेना डिस्चार्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 01:37 IST

शासकीय आणि खासगी रुग्णालये ओसंडली, ऑक्सिजनचा तुटवडा,  रेमडेसिवीरचा साठा केवळ मोजक्याच मेडिकलमध्ये हे गुरुवारचे चित्र शुक्रवारी दुसऱ्या दिवशी देखील कायम होते. काही रुग्णांना ऑक्सिजन बेड तर कुणाला व्हेंटिलेटर व कुणाला रेमडेसिवीर मिळेना अशी आरोग्य व्यवस्थेची पार वाताहात झाल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले.  या सर्व गदारोळात खासगी रुग्णालयांनी तर प्रचंड मनमानी चालवल्याने एका रुग्णाला पाच लाखांचा मेडिक्लेम असूनही थोड्या रकमेसाठी डिस्चार्ज मिळेना, तर कुठे व्हेंटिलेटर हव्या असलेल्या रुग्णाला सर्व रुग्णालये फिरुनही व्हेंटिलेटर मिळत नसल्याने ॲम्ब्युलन्समध्येच तडफडत उपचार करून घेण्याची वेळ आली. 

ठळक मुद्देखासगीतील मनमानी बाधित गंभीर रुग्णांची अवस्था अधिकच बिकट

नाशिक : शासकीय आणि खासगी रुग्णालये ओसंडली, ऑक्सिजनचा तुटवडा,  रेमडेसिवीरचा साठा केवळ मोजक्याच मेडिकलमध्ये हे गुरुवारचे चित्र शुक्रवारी दुसऱ्या दिवशी देखील कायम होते. काही रुग्णांना ऑक्सिजन बेड तर कुणाला व्हेंटिलेटर व कुणाला रेमडेसिवीर मिळेना अशी आरोग्य व्यवस्थेची पार वाताहात झाल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले.  या सर्व गदारोळात खासगी रुग्णालयांनी तर प्रचंड मनमानी चालवल्याने एका रुग्णाला पाच लाखांचा मेडिक्लेम असूनही थोड्या रकमेसाठी डिस्चार्ज मिळेना, तर कुठे व्हेंटिलेटर हव्या असलेल्या रुग्णाला सर्व रुग्णालये फिरुनही व्हेंटिलेटर मिळत नसल्याने ॲम्ब्युलन्समध्येच तडफडत उपचार करून घेण्याची वेळ आली. जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयांचे बेड ओसंडून वाहत असून कॉरिडॉरमध्येदेखील बेडना जागा उरलेली नाही. ऑक्सिजन बेड तर तीन दिवसांपासून फुल्ल झाले आहेत. जोपर्यंत एखादा रुग्ण बरा होऊन घरी जात नाही किंवा कुणाचे निधन होत नाही तोपर्यंत त्या रुग्णालयातील बेड अन्य कुणाला मिळू शकत नाही, अशी परिस्थिती कायम असल्याने ओळखपाळख काढून रुग्णालयांच्या सर्व अटी मान्य करीत दाखल करून घेण्यावाचून कुटुंबीयांसमोर कोणताही मार्ग उरलेला नसल्याचेच चित्र आहे.रेमडेसिवीरसाठी रांगा कायमशासनाच्या अन्न-औषध विभागाकडून १२ हजार रेमडेसिवीरची मागणी उत्पादकांकडे नोंदवण्यात आली होती. मात्र, अद्यापही हा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे केवळ काही मोजक्याच विक्रेत्यांकडे आता रेमडेसिवीर शिल्लक असल्याने त्या दुकानांपुढे रांगाच रांगा असे चित्र शुक्रवारीदेखील कायम होते. त्यामुळे नागरिकांना काही दुकानांमध्ये चढ्या दराने रेमडेसिवीर घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. काही दुकानांमध्ये ५ ते ६ हजार रुपयांना रेमडेसिवीरची विक्री होत असून नाईलाजास्तव नागरिकांना ते खरेदी करावे लागत आहेत. रुग्णाची तडफडएका अत्यवस्थ रुग्णाला शहरात व्हेंटिलेटर लावणे आवश्यक असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी दिंडोरी येथून त्या रुग्णाला ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन सर्व मोठ्या हॉस्पिटल्समध्ये नेले. मात्र, त्या रुग्णाला कुठेही व्हेंटिलेटरच नव्हे तर ऑक्सिजन बेडदेखील उपलब्ध होईना. सकाळपासून दुपारपर्यंत सर्व रुग्णालये फिरुनही कुठेच व्यवस्था झाली नाही अखेरीस दिंडोरी तालुक्यातच शासकीय रुग्णालयात या रुग्णाला बेड उपलब्ध झाला.रुग्ण सोडण्यास नकारएका मोठ्या रुग्णालयात एका ज्येष्ठ नागरिकाचा ५ लाखांचा मेडिक्लेम आणि आगाऊ १ लाखांची  रक्कम आधी भरलेली असूनही संबंधित नागरिक कोविडमुक्त झाल्यानंतरही रुग्णाला डिस्चार्ज देण्यास रुग्णालयाकडून टाळाटाळ केली जात होती. त्यांच्या कुटुंबीयांनी मनपा आयुक्तांकडे तक्रार  केल्याने मनपाचे अधिकारी तेथे गेल्यावर रुग्णाला डिस्चार्ज मिळाला.

टॅग्स :Nashikनाशिकhospitalहॉस्पिटल