शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

खाल्ली मिसळपाव तर बिघडले कोठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:14 IST

नाशिक : दुकानाचे शटर नुसते किलकिले केले की पाच हजाराचा, सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास हजार रुपये दंड ...

नाशिक : दुकानाचे शटर नुसते किलकिले केले की पाच हजाराचा, सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास हजार रुपये दंड तर नियम डावलून उपहार गृह सुरू ठेवल्यास ते कायमस्वरूपी बंद करण्याची शिक्षा आपत्ती व्यवस्थापन कायद्यात नमूद करण्यात आली आहे. अर्थातच गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीचा व लॉकडाऊनचा सामना करणाऱ्या प्रत्येक नाशिककरांना आता आपत्ती व्यवस्थापन कायदा तसा चांगला पाठही झाला आहे. तरीही, या कायद्याच्या उल्लंघनाची पावलोपावली घोडचूक करणारे दररोजच पोलीस व महापालिका प्रशासनाला गवसत आहेत. दंड व दंडुक्याचा वापर करून घोडचूक करणाऱ्यांना वेसन घालण्याचे काम अविरत केले जात असून, त्यात फक्त शहरातील जनताच बेदरकार आहे, असे नव्हे तर ग्रामीण भागातदेखील या कायद्याचा आधार घेऊन ग्रामसेवकांकरवी जिल्हा परिषदेमार्फत कारवाई केली जात आहे. हे सारे सांगण्याचे तात्पर्य इतकेच की, वर्षभरापासून अस्तित्वात असलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर करण्याचे अधिकार ज्या घटना व्यवस्थापकांना प्रदान करण्यात आले आहेत, त्यांच्या समक्षच या कायद्याचे सर्रास उल्लंघन करण्याचे धाडस सहसा कोणी न्यायप्रिय व्यक्ती करूच शकणार नाही. तसे केल्यास त्याची कोणतीच खैर राहणार नाही, हे नव्याने सांगायला नको; परंतु या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कायद्याच्याच रक्षकांकडून भररस्त्यात शामियाना उभारला जात असेल व मुदत टळून गेल्यावरही उपहार गृहचालक झणझणीत मिसळ पाव पुरवित असेल तर त्याचा दोष कोणी कोणाला लावायचा? आयोजकांना, सेवा देणाऱ्यांना की, हा सारा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहात त्याचा आस्वाद घेणाऱ्यांना?; परंतु असले प्रश्न पडून काही उपयोग होईल, असे मुळात वाटून घेण्याचे कारण नाही. गेल्या वर्षभरापासून कोरोनाशी दोन हात करण्याचे बळ आपल्या हाताखालील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये भरण्याबरोबरच जनतेलाही त्याबाबत अवगत करण्याचे काम करणारे, प्रसंगी शासनाकडून कानउघाडणी तर प्रसिद्धी माध्यमांकडून केली जाणारी बोचरी टीका सोसूनही खंबीर राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी वेळात वेळ काढून लालगालिचा, नरम नरम खुर्च्या, आकर्षक कनातीचा मंडपात बसून मिसळचा आस्वाद घेतला तर बिघडले कोठे? लॉकडाऊनच्या काळात जारी करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन अधिकाऱ्यांनी नव्हे तर त्यांच्यासाठी सोय करणाऱ्या हाताखालच्या यंत्रणेने केले आहे, बोल लावायचे तर त्यांनाच लावावे लागेल. अधिकारी फक्त निमित्तमात्र होते!