शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा कुठे फेडणार हे पाप?

By admin | Updated: February 12, 2017 00:41 IST

रामदास कदम : सिडकोतील सभेत केली टीका

सिडको : भाजपाने हल्ली गुंडांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना पवित्र करणे व जनतेला त्रास देण्याचे उद्योग अवलंबिले असून, हे पाप भाजपा कसे फेडणार, असा सवाल पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे.महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मधील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, श्रमिक सेनेचे शिवाजी भोर, महिला आघाडीच्या महानगरप्रमुख डॉ. शामला दीक्षित, सुभाष गायधनी आदि उपस्थित होते. रामदास कदम पुढे म्हणाले, भाजपा ही गेल्या पंचवीस वर्षांपासून सेनेच्या पाठीत खंजीर खुपसत आहे. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री हेदेखील सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करीत आहे. अच्छे दिन येतील, देशातील काळेधन बाहेर येईल, असे मोदी सांगत होते. परंतु प्रत्यक्षात असे काहीच झाले नाही. याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवरच झाला. गोध्रा हत्त्याकांड घडल्यावर नरेंद्र मोदींना भाजपा पक्षातून काढणार होते. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी मध्यस्थी करीत मोदींना काढू नये, असे सांगितले. विधानसभेत युती ठेवायची नाही ही भाजपाची चाल होती, परंतु त्यांनी शेवटपर्यंत गाफील ठेवले. यानंतरही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ६३ आमदार निवडून आले. भाजपा सरकार हे वेगळा विदर्भ करण्याची भाषा करीत असून, अखंड महाराष्ट्राची शपथ घेतात. यामुळे यापुढील काळात कोणीही गाफील राहणार नसून, आदेश येताच राजीनामे देणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.शिवसेनाप्रमुखांनी छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे यांना मोठे केले. ज्यांनी ज्यांनी सेनाप्रमुखांना त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांचे आज काय हाल होत आहेत, ते सर्वश्रृत आहे. यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत भाजपासह राष्ट्रवादी, मनसे या पक्षांना भुईसपाट होतील असा दावाही रामदास कदम यांनी केले. यावेळी सेनेचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी प्रास्ताविक केले.आभार श्यामकुमार साबळे यांनी मानले. हर्षा बडगुजर व चारूशीला गायकवाड यांनी स्वागत केले. (वार्ताहर)