शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेत्यांनी युतीचा य कधी काढला?

By admin | Updated: January 17, 2017 23:52 IST

शिवसेना : युतीच्या कुबड्यांची गरज नसल्याची अजय बोरस्ते यांची टीका

नाशिक : गेल्यावेळी महापालिका निवडणुकीत भाजपानेच शिवसेनेशी युती तोडण्याचे पाप केले होते, आताही तेच करीत आहे. एका लाटेवर निवडून येणाऱ्या भाजपाच्या अहंकारामुळेच स्वबळाची भाषा बोलली जात असल्याची टीका शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केली आहे. आपण फोन उचलत नसल्याचा भाजपाच्या नेत्यांचा आरोप खोडून काढताना भाजपाचे नेते पदवीधर निवडणुकीसाठी पाठिंबा मागण्यासाठी संपर्क साधतात, मात्र महापालिका निवडणुकीत युतीचा ‘य’ कधी त्यांनी उच्चारला नाही, असे सांगून पक्षाची खरी ताकद किती याचे आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.महापालिका निवडणुकीत भाजपाने स्वबळावर लढण्याची घोषणा केली. आमदार बाळासाहेब सानप यांनी इच्छुकांच्या निवडणुकीच्या प्रारंभीच ही घोषणा करताना भाजपाचे स्थानिक नेते प्रतिसाद देत नसल्याचा दावा केला होता. यासंदर्भात अजय बोरस्ते यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी भाजपावर टीका केली. गेल्यावेळी युती तोडून भाजपानेच जनतेचा विश्वासघात केला होता, आताही ते तोच प्रकार करीत आहेत. नुकत्याच नगरपालिका निवडणुका झाल्या. त्यात जिल्ह्यातील सहा नगरपालिकांपैकी चार जागा शिवसेनेने स्वबळावर जिंकल्या. एका नगरपालिकेतच कमळ फुलले, परंतु त्याला शिवसेनेचा टेकू होता असे सांगून ते म्हणाले की, लाटेवर निवडून आलेल्या भाजपाच्या आमदारांना आता आपले बळ वाढल्याचे वाटत आहे, परंतु आता त्यांनी आपले खरे बळ किती याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. असे बोरस्ते म्हणाले.