शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

डिहायड्रेशन होऊन अशक्त झालेल्या गायीला सलाईन लावले जाते तेव्हा...

By admin | Updated: May 20, 2014 00:10 IST

पांडाणे : डिहायड्रेशनचा त्रास होऊन अशक्त बनलेल्या एका गायीला दिंडोरी पंचायत समितीच्या आवारात सलाईन लावून जीवदान देण्यात आले.

पांडाणे : डिहायड्रेशनचा त्रास होऊन अशक्त बनलेल्या एका गायीला दिंडोरी पंचायत समितीच्या आवारात सलाईन लावून जीवदान देण्यात आले.दिंडोरी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर एक गाय अचानक चक्कर येऊन पडली. त्यावेळी निफाड येथून कामकाजासाठी आलेल्या पूजा प्रल्हाद धुमाळ यांनी आवारातील एका हॉटेलमधून पाण्याच्या दोन बाटल्या आणल्या व गायीला पाणी पाजले. अल्पावधीतच मोठ्या संख्येने नागरिक तेथे गोळा झाले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. के. वायंडे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी एम. एच. काकडे यांना भ्रमणध्वनी करून घटनेची माहिती दिली. गायीची अवस्था पाहून आवारातच तिला सलाईन देण्यात आले. शिळे अन्न खाण्यात आल्याने गायीला डिहायड्रेशनचा त्रास झाला असावा, असा निष्कर्ष उपचार करणार्‍या डॉक्टरांनी काढला.याप्रसंगी हातनोरे, अ. व. अहेर यांच्यासह नागरिकांनी सहकार्य केले. तत्काळ मदत मिळाल्याने गायीचे प्राण वाचू शकले. धावपळीच्या जमान्यात माणुसकी धर्म टिकून आहे हे पाहून बरे वाटते, अशा प्रतिक्रिया यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या.