शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

घोटी-सिन्नर रस्त्यातील खड्ड्यात रुग्णवाहिका अडकून पडते तेव्हा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:49 IST

: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे घोटी-सिन्नर रस्त्यावर मुंबईला जाणारी रुग्णवाहिका दोन तास रस्त्यातल्या खड्ड्यात अडकून पडल्याने रुग्णवाहिकेतील रुग्णाची प्रकृती कमालीची गंभीर झाल्याची घटना गुरुवारी (१६) घडली.

देवळाली कॅम्प : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे घोटी-सिन्नर रस्त्यावर मुंबईला जाणारी रुग्णवाहिका दोन तास रस्त्यातल्या खड्ड्यात अडकून पडल्याने रुग्णवाहिकेतील रुग्णाची प्रकृती कमालीची गंभीर झाल्याची घटना गुरुवारी (१६) घडली. विशेष म्हणजे रस्त्यातील खड्डे व त्यामुळे विस्कळीत झालेल्या वाहतूक व्यवस्थेत अडकलेली रुग्णवाहिका बाहेर काढण्यासाठी जवळील एका हॉटेलमधील मालक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल्याने तब्बल दोन तासांनंतर रुग्णवाहिका गर्तेतून बाहेर पडली.  सांयकाळी ५ वाजेच्या दरम्यान संगमनेर येथून रुग्णाला खासगी दवाखान्यातून घेऊन रुग्णवाहिका मुंबईच्या दिशेने सिन्नर-घोटी मार्गाने निघाली होती. सात वाजेच्या सुमारास पांढुर्लीच्या पुढे रस्त्याच्या खड्ड्यांनी रुग्णवाहिकेचा वेग मंदावला. ८ वाजता रुग्णवाहिका खड्ड्यातून मार्ग काढत मुंबईकडे मार्गक्रमण करत असताना हॉटेल कुबेर लक्ष्मीजवळ रस्त्याला पडलेल्या मोठ्या खड्ड्यात अडकून पडली. चालकाने अथक प्रयत्न करूनही गाडी खड्ड्यातून बाहेर पडत नसल्याचे पाहून रुग्णासोबत असलेल्या नातेवाइकांची पाचावर धारण बसली, तर रुग्णाची प्रकृतीही खालावू लागल्याचे पाहून त्यांनी रुग्णवाहिकेतून उतरून जवळील हॉटेलकडे धाव घेत मदतीची विनंती केली.  यावेळी हॉटेलचे मालक राहुल सोनवणेंसह हॉटेलमधील कर्मचाºयांनी रुग्णवाहिकेकडे धाव घेत प्रयत्न सुरू केल्याने जवळपास दोन तासांनंतर रुग्णवाहिका खड्ड्यातून कशीबशी बाहेर काढून मार्गस्थ करून दिली.  घोटी-सिन्नर रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून, या रस्त्याने अवजड वाहने मार्गस्थ करीत असल्याने अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अतिशय मंदावली आहे. या खड्ड्यांकडे कायमच दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत असून, काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला, परंतु त्यानंतर लगेचच रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली.  घोटी-सिन्नर या शिर्डी जोडणाºया महामार्गावर पावसाने मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, संबंधित विभागाचे रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. एकीकडे समृद्धी महामार्गासाठी प्रयत्न केले जात असताना जुना रस्त्याच्या दुरुस्तीअभावी अनेकांना जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागत आहे.- राहुल सोनवणे, प्रवासी

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा