शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

खुद्द कृषिमंत्रीच हतबल होतात तेव्हा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:16 IST

येथील मोसम पुलावरील जनसंपर्क कार्यालयात झालेल्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत भुसे बोलत होते. गेल्या आठवड्यात तालुक्यातील ...

येथील मोसम पुलावरील जनसंपर्क कार्यालयात झालेल्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत भुसे बोलत होते. गेल्या आठवड्यात तालुक्यातील कोठरे येथील रुग्णाच्या वाढीव बिलावरून भुसे यांनी सटाणा रोडवरील एका नामांकित खासगी रुग्णालयात स्टिंग ऑपरेशन करून रुग्णांकडून आर्थिक लूट केली जात असल्याची बाब उघडकीस आणली होती. यानंतर देखील संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्यात आली नाही. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (दि. ७) त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात बैठक झाली. यावेळी भुसे यांनी सांगितले, शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा संबंधित रुग्णालयात लाभ दिला जातो. मात्र, योजनेचा लाभ योग्यप्रकारे दिला जात नाही. आतापर्यंत १ हजार ४८६ रुग्णांना जीवनदायी योजनेतून उपचार करण्यात आले आहेत. शासनाने २ कोटी ४३ लाख ९९८ रुपये अदा केले आहेत, तरी देखील रुग्णांच्या नातेवाइकांकडून वाढीव बिले आकारली जातात. संबंधित रुग्णालय शासकीय सेवेत असलेल्या डॉक्टरांच्या व सध्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या नावावर आहे. खोट्या कागदपत्रांचा वापर करून रुग्णालय चालवले जात आहे. शासकीय सेवेत असताना डॉक्टरांच्या नावाखाली रुग्णालय कसे सुरू करता येते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बैठकीला बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, राजेंद्र जाधव, उपमहापौर नीलेश आहेर, महानगर प्रमुख रामा मिस्तरी, तालुकाप्रमुख संजय दुसाने, मनोहर बच्छाव, प्रमोद शुक्ला, विनोद वाघ, प्रमोद पाटील आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

इन्फो

अधिकाऱ्यांवर ठपका

राज्याच्या जबाबदार पदावर असल्यामुळे पोलीस अधिकारी व महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. मात्र, जबाबदार अधिकाऱ्यांनी चौकशी केली नाही. चुकीचे काम शिवसेना पदाधिकारी खपवून घेणार नाही. येत्या गुरुवारपर्यंत कारवाई झाली नाही तर कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन केले जाईल, असा इशारा कृषिमंत्री भुसे यांनी दिला.

फोटो- ०७ मालेगाव दादा भुसे

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना कृषिमंत्री दादा भुसे. समवेत पदाधिकारी.

===Photopath===

070621\07nsk_33_07062021_13.jpg

===Caption===

फोटो- ०७ मालेगाव दादा भुसे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना कृषिमंत्री दादा भुसे. समवेत पदाधिकारी.