नाशिक : सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या दुचाकीची दोन्ही चाके ड्रमसह चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना आडगाव शिवारात घडली आहे़ सर्वज्ञ अपार्टमेंटमधील रहिवासी नितीन रामभाऊ केदार यांनी दुचाकी पार्किंगमध्ये लावलेली होती़ चोरट्यांनी या दुचाकीची दोन्ही चाके ड्रमसह चोरून नेली़ या प्रकरणी केदार यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
आडगावला दुचाकीच्या चाकांची चोरी
By admin | Updated: April 11, 2016 00:04 IST