शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात गहू उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:51 IST

जळगाव नेऊर : परिसरासह येवला तालुक्यात उन्हाळ्याची चाहूल लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी गहू सोंगणीला सुरु वात केली आहे. यावर्षी गव्हाच्या ...

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : सोंगणीसाठी हार्वेस्टर मशीनला पसंती

जळगाव नेऊर : परिसरासह येवला तालुक्यात उन्हाळ्याची चाहूल लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी गहू सोंगणीला सुरु वात केली आहे. यावर्षी गव्हाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली असली तरी बदलत्या हवामानामुळे उत्पादनात घट झाल्याचे चित्र आहे. शेतकरी गहू सोंगणीला हार्वेस्टर मशीनला पसंती देत असल्याने राज्य, परराज्यातून हार्वेस्टर मशीन दाखल झाले आहेत.स्थानिक गहू उत्पादक शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून हार्वेस्टर मशीनद्वारे गहू सोंगणीचा व्यवसाय सुरू केला आहे. दरवर्षी पंजाब व हरयाणा राज्यातील हार्वेस्टर महाराष्ट्रात दाखल होतात. परंतु ठरावीक कालावधीनंतर हे मशीन परत जातात. त्यामुळे उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकाला सोंगणीसाठी हार्वेस्टर मशीन मिळत नसल्याने अनेक शेतकºयांना मजूर लावून सोंगणी करावी लागते. त्यामुळे स्थानिक तरु णांनी हार्वेस्टर मशीन विकत घेऊन शेतीला जोडधंदा म्हणून पर्याय शोधला आहे. तसेच हार्वेस्टर मशीनमधून गहू, मका, सोयाबीनची चाळणी बदल करून सोंगणी होत असल्याने वर्षभर व्यवसाय सुरू असतो. सध्या गव्हाची सोंगणी सुरू असल्याने या मशीनच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. हार्वेस्टरने तीस मिनिटात एक एकर गव्हची सोंगणी केली जाते. दोन हजार रु पये प्रतिएकर सोंगणी असा दर मिळत आहे.रोगट हवामानाचा सामनावातावरण बदलामुळे गव्हाचे उत्पादन घटले. यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे व कांदा रोपे नसल्यामुळे शेतकºयांनी गहू पिकाला पसंती दिली. परंतु ढगाळ वातावरण, थंडीचा अभाव यामुळे या पिकास रोगट हवामानाचा सामना करावा लागला. परिणामी गहू उत्पादनात घट निर्माण झाली आहे. सध्या गव्हाची सोंगणी सुरू असून, गव्हाला साधारणपणे एकरी दहा ते बारा क्विंटलपर्यंत उत्पादन निघत आहे. हेच उत्पादन शेतकºयांना २० क्विंटलपर्यंत निघणे अपेक्षित होते, परंतु ढगाळ व परतीच्या पावसाचा फटका गहू पिकाला बसल्याने उत्पादनात घट निर्माण झाली आहे.स्वत:चे गव्हाचे क्षेत्र आहे. पंजाब, हरयाणातून दाखल झालेले हार्वेस्टर मशीन मालक साधारणपणे महिनाभर कमाई करून आपल्या राज्यात परत जातात. उशिराने लागवड केलेला गहू सोंगणीसाठी पंचायत होत असे. स्थानिक शेतकºयांना आपल्या पिकाची वेळेत सोंगणी करता यावी आणि आपल्यालाही चार पैसे मिळतील या हेतून हार्वेस्टर मशीन विकत घेऊन शेतीला जोडधंदा निर्माण केला.- देव शिंदे, उद्धव बोराडे, हार्वेस्टर मशीन मालक, जळगाव नेऊर

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती