शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

काय आहे ‘व्हर्च्युअल कॅम्पस?’ व्हर्च्युअल कॅम्पसद्वारे रोजगाराच्या संधी

By admin | Updated: September 21, 2014 00:51 IST

काय आहे ‘व्हर्च्युअल कॅम्पस?’ व्हर्च्युअल कॅम्पसद्वारे रोजगाराच्या संधी

 

नाशिक, दि. २० - मागील काही दिवसांत निर्माण झालेले मंदीचे सावट आता हळूहळू दूर व्हायला लागले आहे; परंतु असे आशावादी चित्र असतानाही कंपन्यांना लागणारे मनुष्यबळ विकसित करण्यात महाविद्यालये कुठेतरी मागे पडत आहेत़ याचाच फायदा उचलत काही प्लेसमेंट एजन्सीवाल्यांनी नवे अभ्यासक्रम आणले आहेत़ मात्र, या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बक्कळ पैसे मोजावे लागतात, जे सर्वांना परवडत नाही़ अशा स्थितीत विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयातच असे अभ्यासक्र म शिकविल्यास हा खर्च वाचू शकतो़ हीच बाब लक्षात घेऊन शहरातील काही महाविद्यालयांनी ‘व्हर्च्युअल कॅम्पस’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. ‘व्हर्च्युअल कॅम्पस’ म्हणजे नेमके काय, यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्नक़ॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जातात. सुरुवातीला ‘कॅम्पस प्लेसमेंट’ची क्रेझ असल्याने अनेक कंपन्यांनी युवकांना रोजगार प्रदान केले. मात्र, कंपन्यांना यातून निराशाच हाती लागली. परिणामी, कॅम्पसचे ग्लॅमर ओसरले. यामागे जागतिक मंदीचे कारण जरी सांगण्यात आले असले तरी ते काही शंभर टक्के खरे नाही़ कंपन्यांना हवे असलेले मनुष्यबळ मिळत नसल्याने कंपन्यांचा तोटा वाढू लागला. यावर तोडगा काढण्यासाठीच व्हर्च्युअल कॅ म्पस ही संकल्पना तयार करण्यात आली आहे. यानुसार महाविद्यालयात प्लेसमेंटसाठी येणाऱ्या कंपन्यांना लागणारे मनुष्यबळ विकसित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. ‘व्हर्च्युअल क ॅम्पस’ विद्यार्थी, महाविद्यालये व कंपनी या तिघांसाठी उपयोगी ठरले आहे. ‘व्हर्च्युअल कॅम्पस’च्या माध्यमातून कंपन्यांना हवे असणारे मनुष्यबळ विकसित करता येईल. मनुष्यबळ विकसित करा१९९७ च्या सुमारास ‘व्हर्च्युअल कॅम्पस’ ही संकल्पना उदयास आली. कंपन्यांना लागणारे मनुष्यबळ विकसित करण्यासाठी याचा उपयोग होत होता. ‘व्हर्च्युअल कॅम्पस’च्या माध्यमातून अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कंपनीत काम करण्याच्या पद्धती व तेथील व्यवस्थापन, सोयी, सुविधा, बाजारात असलेली ब्रॅडिंग याबाबतही माहिती देण्यात येते. तीन किंवा चार वर्षांच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय शिकविले जातात. ‘व्हर्च्युअल कॅम्पस’च्या माध्यमातून चारही वर्षांत शिकविलेल्या सर्व विषयांची उजळणी केवळ काही मिनिटांत करता येणार आहे. महाविद्यालयनिहाय व सर्व महाविद्यालयांसाठीदेखील यात वेगवेगळी सोय करण्यात आली आहे. शहरात भरपूर संधीशहरात नव्या कंपन्यांचे प्रकल्प सुरू झाल्यास अनेकांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात़ या कंपन्यांना कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे.येणाऱ्या काळात सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, मेंटेनन्स, आऊटसोर्सिंग, बीपीओ या कंपन्या भरभराटीस येतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. एवढेच नाही तर प्रत्येक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना येथे रोजगार मिळणार असल्यामुळे बाहेर देशात जाणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल़विद्यार्थी व शिक्षकांना लाभदायकदेशातील महाविद्यालये व विद्यापीठांतून कं पन्यांना पाहिजे तेवढे मनुष्यबळ मिळत नाही. त्यामुळे आता कंपन्या स्वत:च नवे अभ्यासक्रम तयार करण्यास प्राधान्य देत आहेत. हे अभ्यासक्रम देशातील काही महाविद्यालयांतून शिकविले जातात. विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या काही महाविद्यालयांसोबत ‘व्हर्च्युअल कॅम्पस’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान केले जाते. ‘व्हर्च्युअल कॅम्पस’ महाविद्यालयात सुरू करून त्याचा फायदा विद्यार्थी व तेथील शिक्षकांनादेखील मिळू शकेल.कंपनीनिहाय स्किल सेट देशभरातील शेकडो महाविद्यालयांत या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. शिक्षकांनादेखील याचा फायदा होतो. ज्या महाविद्यालयात नवीन स्टाफ आहे किंवा शिक्षकांची कमतरता आहे, अशा महाविद्यालयातदेखील हे प्रभावी ठरले आहे. कंपन्यांना लागणारे नेमके कौशल्य यातून मिळते. शिवाय कंपनीच्या वतीने आयोजित केलेल्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या जीवनात याचा फायदा होतो.