शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी गटार योजनेची उपयुक्तता काय?

By admin | Updated: February 4, 2017 01:28 IST

प्रश्नचिन्ह कायम : अतिवृष्टीमुळे योजनेचे पितळ उघडे; गैरव्यवहार-भ्रष्टाचारामुळे योजना गाजली; झाले अधीक्षक अभियंत्याचे निलंबन

नाशिक : केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान योजनेअंतर्गत नाशिक महापालिकेने शहरात सुमारे ४०० कोटी रुपये खर्चून ‘पावसाळी गटार योजना’ राबविली, परंतु या योजनेची नेमकी उपयुक्तता काय, याचे कोडे आजपर्यंत नाशिककरांना उलगडलेले नाही. दरवर्षी पावसाळ्यात या योजनेचे पितळ उघड पडत आले आहे. परंतु, महापालिका प्रशासन त्याच्यापासून धडा शिकायला तयार नाही आणि लोकप्रतिनिधीही त्याबाबत फारसे गंभीर नाहीत. महापालिका निवडणुकीत पावसाळी गटार योजनेचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जाऊ शकतो. महापालिकेमार्फत आजवर राबविण्यात आलेली सर्वाधिक खर्चाची योजना म्हणून पावसाळी गटार योजनेकडे पाहिले जाते. महापालिकेच्या सुकाणू समितीने केंद्र व राज्य सरकारकडे पावसाळी गटार योजनेसाठी ३२८ कोटी ३३ लाख रुपयांचा आराखडा सादर केला होता. त्यात शासनाने कपात करत ती ३१० कोटींवर आणली होती. महापालिकेने निविदाप्रक्रिया राबवून योजनेच्या ६१ कामांना सन २००७ मध्ये मंजुरी दिली होती. सदर योजना राबविण्यापूर्वी त्यावर टीकाही भरपूर झाली होती. नाशिकची भौगोलिक स्थिती पाहता पावसाचे पाणी वाहून नेण्याइतपत ही योजना उपयुक्त ठरेल काय, असे प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु, योजनेचे अनेक फायदे पटवून देत प्रशासनाने शहरात सदर योजना राबविण्यास सुरुवात केली. त्यासाठी शहरात ३०५ किलोमीटर पाइपलाइन टाकण्याला मंजुरी मिळाली होती. योजनेसाठी ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आल्याने शहरातील वाहतुकीवर त्याचा ताण पडला होता. कोणतेही नियोजन न करता ही योजना साकारण्यात आल्याने अनेक आरोपही झाले. गैरव्यवहार-भ्रष्टाचारामुळे योजना गाजली. अधीक्षक अभियंत्याचे निलंबनही झाले होते. सुमारे तीन-साडेतीन वर्षांपूर्वी सदर योजना पूर्णत्वाला गेली, परंतु ती संपूर्ण शहरात नव्हे तर ठराविक भागातच राबविण्यात आली. मात्र आतापर्यंत या योजनेचा नेमका काय फायदा झाला, याचे कोडे नाशिककरांना आजपर्यंत सुटलेले नाही. दर पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्याचा अनुभव नाशिककर घेत आले आहेत. ज्या भागात पावसाळी गटार योजना राबविली गेली नाही तेथील अवस्था तर भयावह आह,े परंतु जेथे योजना राबविली तेथील स्थिती तर आणखी अवघड बनलेली आहे. पाण्याचा निचराच होत नसल्याने आजही अनेक भागांत पावसाचे पाणी साचून निर्माण झालेली तळी पाहायला मिळतात. महापालिका निवडणुकीत पावसाळी गटार योजनेचाही मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)