शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

किसनदेवाच्या करंगळीला काय झाले ?

By admin | Updated: August 3, 2014 01:59 IST

किसनदेवाच्या करंगळीला काय झाले ?

दोन वर्षांपूर्वी वेद-वेदांग राष्ट्रीय पुरस्काराची पूर्णाहुती करण्यात आली आणि आता सारडा चॅरिटेबल फाउण्डेशनच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘सारडा समान संधी’ पुरस्काराचे विसर्जन करण्यात आले. उद्योजक किसनलाल सारडा आणि श्रीरंग सारडा या पिता-पुत्राचे सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील योगदान सर्वज्ञात आहे. वेद वाङ्मयाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने सारडा कुटुंबीयाने २५ वर्षे अखंडपणे ‘वेद-वेदांग पुरस्कार’ योजना राबविली आणि देशभरातील वेदपंडितांना नाशिकला निमंत्रित करत त्यांना सन्मानित केले. परंतु एकामागोमाग वर्षे सरत गेली तशी पुरस्कारयोग्य वेदपंडितांना हुडकून काढण्याची कसरतही सारडा यांना करावी लागली. या मोहिमेत अडचणी येत असल्याचे वास्तव अस्वस्थ करून सोडत असतानाच, किसनलाल सारडा यांनी सन २०१२ मध्ये ‘वेद-वेदांग राष्ट्रीय पुरस्कार’ बंद करण्याची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला होता. आता सारडा यांनी तळागाळातील पीडितांचे जीवनमान उंचाविणाऱ्या संस्था व व्यक्तींसाठी गेल्या १४ वर्षांपासून अखंडपणे दिल्या जाणाऱ्या ‘सारडा समान संधी’ पुरस्काराची सांगता करत आणखी एक धक्का दिला आहे. साडेसात लक्ष रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. समाजात नि:स्पृह आणि निष्काम भावनेतून काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना उभारी देणारा आणि त्यांची उमेद वाढविणारा हा पुरस्कार होता. या पुरस्कारासाठी कोणाकडूनही अर्ज मागविले जात नव्हते, तर फाउण्डेशन स्वत: देशभर भटकंती करत पुरस्कारयोग्य संस्था अथवा व्यक्तींना हुडकून काढत असे व हेच या पुरस्काराचे वेगळेपण होते. ग्रामीण उद्योगांच्या माध्यमातून वंचित व उपेक्षित घटकांना स्वत:च्या पायावर उभे करणारे साताऱ्याचे बाळासाहेब धोंडीबा कोळेकर यांच्यापासून सुरू झालेला पुरस्काराचा प्रवास गेल्या वर्षी मदुराईतील धन फाउण्डेशनपर्यंत येऊन विसावला. या प्रवासात सारडा फाउण्डेशनला विजी श्रीनिवासन, श्रीमती एन. राधा, कांचन परुळेकर, रिटा रॉय, शोभा साखरवाडे, अच्युत दास, सुभाष मेंढापूरकर, वासिमलाई यांसारखे झाकलेले माणिक-मोती गवसले. पुरस्काराच्या निमित्ताने काही संस्थांच्या सेवाभावी कार्याचा परिचय लोकांना झाला. पुरस्काराचा वितरण सोहळा दरवर्षी मुंबईत मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत होत राहिला. एवढ्या मोठ्या रकमेच्या पुरस्काराची योजना राबविताना सारडा कुटुंबीय सदैव पुरस्काराचा १४ वर्षांचा प्रवास सुरळीत होता. दरवर्षी मुक्कामाची एकेक गावे शोधत पुरस्कार योजनेची गाडी पुढे मार्ग कापत होती. सारे सुरळीत असताना, सारडा फाउण्डेशनला पुरस्कार का थांबवावासा वाटला? किसनलाल सारडा यांनी पुरस्कार योजनेचा उचललेला गोवर्धन व्रतस्थपणे काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना उभारी देत होता. कुठेतरी थांबणे अनिवार्य होते असे फाउण्डेशनचे मत झाले असले, तरी ही अनिवार्यता कशामुळे ओढवली? किसनदेवाची करंगळी गोवर्धन पेलवू शकत नाही, असे म्हणणेही उचित ठरणार नाही. मग नेमके करंगळीला झाले काय? - असे अनेक प्रश्न सारडा कुटुंबीयांना अगदी जवळून ओळखणाऱ्या सुहृदांच्या मनात घोंगावत असणार ! वेद-वेदांग पुरस्काराला योग्य असे पंडित हुडकणे मुश्कील होऊन बसले, तेव्हा या पुरस्काराचे विसर्जन करण्यात आले होते. वेदवाङ्मयाची क्लिष्टता आणि त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता या पुरस्काराचे विसर्जन होणे अपेक्षितच होते. कुणाच्याही पदरात पुरस्काराचे दान टाकणे हेसुद्धा त्या पुरस्काराच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे ठरले असते. म्हणूनच की काय, वेद-वेदांग पुरस्काराची पूर्णाहुती करण्याच्या निर्णयाचे समर्थनच केले गेले होते. मात्र, वेद-वेदांग पुरस्काराच्या योजनेत येणाऱ्या अडचणींचे स्वरूप निराळे होते. सारडा समान संधी पुरस्कारासाठी लायक व्यक्ती अथवा संस्थांचा शोध १४ वर्षांतच थांबवावा लागणे, हे कशाचे लक्षण समजायचे? निष्काम व सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या संस्था अथवा व्यक्ती आता समाजात अजिबातच उरल्या नाहीत, की सारडा फाउण्डेशनची शोधक नजर कमजोर झाली? समाजात समान संधीचा झगडा संपला आहे काय? अर्थात हे सारे प्रश्न उपस्थित होणार असले, तरी पुरस्कार योजना सुरू करणे आणि ती कधीही-केव्हाही थांबविणे हा सर्वस्वी सारडा फाउण्डेशनचा निर्णय आहे. त्याबाबत त्यांना कुणी जाब विचारू शकत नाही ्रआणि त्याची गरजही नाही; परंतु व्रतस्थपणे काम करणाऱ्या संस्था अथवा व्यक्तींना उभारी देणाऱ्या पुरस्काराची सांगता होते आहे, हे दु:खदायकच आहे. मुळात फाउण्डेशनला असा अकाली निर्णय घेणे भाग का पडले, याचीही चिकित्सा होणे गरजेचे आहे. एखादा प्रकल्प सुरू करण्यासाठी खूपदा विचार करावा लागतो; परंतु तो थांबविण्यासाठी एक किरकोळ कारणही पुरेसे ठरू शकते. ज्यांना प्रोत्साहन द्यावे आणि इतरांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी, अशा संस्था अथवा व्यक्तींचा शोध जर सारडा फाउण्डेशनला थांबवावा लागत असेल, तर गेल्या चौदा वर्षांत राबविलेला प्रपंच फुकटच गेला म्हणायचा