शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ निराधारांनी काय खायचे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:14 IST

नाशिक : मागील वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे लोकांच्या देणगीवर चालणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था अडचणीत आल्या असून, देणगीचा ओघ ...

नाशिक : मागील वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे लोकांच्या देणगीवर चालणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था अडचणीत आल्या असून, देणगीचा ओघ कमी झाल्याने वृद्धाश्रम, अनाथाश्रम, शाळा यांचे भविष्यात काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजचे अन्न, औषधोपचार यांचा खर्च भागवताना संस्था चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागीलवर्षी असलेले लॉकडाऊन आणि आता पुन्हा नव्याने आलेले निर्बंध यामुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहींची वेतन कपात झाली, याचा परिणाम साहजिकच सेवाभावी संस्थांच्या देणग्यांवर झाला आहे. यामुळे अनाथांना आणि वृद्धांना आश्रय देणाऱ्या या संस्थांना दैनंदिन खर्च भागवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक संस्था आज मिळालेल्या देणगीतून भविष्याची तरतूद करत असतात. यामुळे वर्षानुवर्ष त्यांचे काम सुरळीत सुरु आहे. मात्र, कोरोनाच्या संकटाने या संस्थांचे आर्थिक गणित कोलमडू लागले आहे.

चौकट-

निफाड तालुक्यातील लौकी शिरसगाव येथील सैंगऋषी वृद्धाश्रमात सध्या १० निराधार वृद्ध आहेत. ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा रस्त्यावरील वृद्धांना येथे आधार दिला जातो. संस्था सध्या खूपच अडचणीतून जात असून, हात उसने घेतलेल्या पैशांवर नवनाथ जराड हे संस्थेचा खर्च भागवत आहेत. संस्थेच्या देणगीचा ओघ पूर्णपणे आटला आहे.

चौकट -

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आधाराश्रमात राज्यातील ३० जिल्ह्यांमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ८५ मुले सध्या शिक्षण घेत आहेत. पूर्णपणे देणगीवर चालणाऱ्या या संस्थेला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात एक दिवस काहीच नसल्यामुळे मुलांवर उपाशी झोपण्याची वेळ आली होती. आर्थिक अडचणीमुळे काही मुलांना संस्थेने स्वखर्चाने घरी पाठवले पण उर्वरित मुलांचा खर्च करावाच लागत आहे.

चौकट- ६७ वर्षांची परंपरा असलेल्या नाशिकमधील आधाराश्रम या संस्थेत स्मृती भाेजन आणि प्रीती भोजन योजना चालते. कोविडच्या संकटामुळे सध्या या दोन्हीही योजना पूर्णपणे बंद असल्याने संस्थेला आर्थिक अडचणी येत आहेत. संस्थेला मिळणाऱ्या देणगीचा ओघ बंद झाला आहे. सध्या साठवलेल्या पैशांतून संस्थेचा खर्च सुरु आहे.

चौकट-

वात्सल्य परिवार फाऊंडेशन या संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या संस्थेत सध्या ९० वृद्ध आश्रयाला आहेत. मात्र, देणग्यांचा ओघ कमी झाल्याने सध्या संस्थाचालक स्वत:कडील पैशांतून संस्थेचा खर्च भागवत आहेत. लॉकडाऊनमुळे नागरिकांची भेट होत नसल्याने देणग्या मागायच्या कुणाकडे, असा प्रश्न संस्थेला पडला आहे.

कोट-

रस्त्यावर फिरणाऱ्या निराधारांना आमच्या आश्रमात आश्रय दिला जातो. सध्या आर्थिक अडचणींमुळे नव्याने वृद्धांना प्रवेश देता येत नाही. आमची शेतीची कामे बंद झाल्यामुळे नातेवाईकांकडून हात उसने पैसे घेऊन मी सध्या वृद्धाश्रमाचा खर्च चालवत आहे. जवळपास ५० हजारांचे कर्ज आज झाले आहे.

- नवनाथ जराड, संस्थापक, सैंगऋषी वृद्धाश्रम, लौकी शिरसगाव

कोट - आधाराश्रमातील मुलांचा अन्नधान्य, औषधोपचार यांचा खर्च मोठा आहे. सध्या देणग्यांचा ओघ खूपच मंदावला आहे. यामुळे आहे त्या पैशांतून सध्या खर्च भागवला जात आहे. आज मिळालेल्या देणग्यांमधून भविष्याची तरतूद केली जाते, पण सध्या देणग्या मिळत नसल्याने भविष्याची तरतूद कशी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- राहुल जाधव, दत्तक समन्वयक, आधाराश्रम, नाशिक