शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गाव करी ते राव काय करी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 19:49 IST

केंद्र सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार मिळविणाऱ्या नाशिक तालुक्यातील ओढा व कोटमगाव ग्रामपंचायतींनी जनहिताचे उल्लेखनीय कामे केली

ठळक मुद्देओढा, कोटमगाव ग्रामपंचायतीची देशपातळीवर दखल

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : गाव करी ते राव काय करी असे म्हटले जात असले तरी, त्याची प्रचिती नाशिक तालुक्यातील ओढा व कोटमगाव ग्रामपंचायतीने दिली आहे. केंद्र सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार मिळविणाऱ्या नाशिक तालुक्यातील ओढा व कोटमगाव ग्रामपंचायतींनी जनहिताचे उल्लेखनीय कामे केली असून, त्याचीच दखल घेण्यात आली आहे. यात प्रामुख्याने कचरामुक्त गाव, स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेल्या उपाययोजना व ग्रामपंचायतीतील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न अन्य ग्रामपंचायतींसाठी आदर्शवत आहेत.

ओढा ग्रामपंचायतीची लोकसंख्या ३३२१ इतकी असून, गावाच्या विकासासाठी ग्राम विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. गावात उल्लेखनीय कामकाजात प्रामुख्याने १०० टक्के भूमिगत गटार बांधकाम, कचरामुक्त गाव, ग्रामपंचायतमार्फत आरोग्य केंद्रामध्ये सॅनेटरी पॅड वेंडिग मशीन बसविण्यात आले असून, जलसंधारणांतर्गत गावातील पाझर तलावातील गाळ काढून त्याचे खोलीकरण करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या संगणकीकरणांतर्गत सोशल मीडियाचा वापर करण्यात येत असून, बायोगॅस संयंत्र, गावातील सर्व नागरिकांना पाणी शुद्धीकरण केंद्रामधून पाच रुपयात २० लिटर शुद्ध पाण्याचा लाभ, डिजिटल शिक्षणांतर्गत अंगणवाडी व प्राथमिक शाळेस संगणक व प्रोजक्टर, दर शनिवारी भरणाºया आठवडे बाजार तळासाठी ओटे, उत्पन्न वाढीकरिता बहुउद्देशीय इमारत बांधण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या याकामांची दखल घेत यापूर्वी ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार’देखील मिळाला असून, याकामी सरपंच विष्णू रामभाऊ पेखळे, उपसरपंच शशिकांत सहाणे व ग्रामसेवक दौलत पांडुरंग गांगुर्डे यांच्यासह ग्रामस्थांचा सहभाग वाखाणण्याजोगा आहे.कोटमगाव ग्रामपंचायतीची लोकसंख्या १५७५ असून, गावाचा कायापालट करताना अनेक कामे करण्यात आली आहेत. त्यात गावात वृक्षलागवड, जलशुद्धीकरण केंद्र, डिजिटल शाळा व अंगणवाडी, पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम, गावातील महिला, मुलींसाठी सॅनिटरी पॅड वितरण व विल्हेवाट मशीन, कुपोषित बालकांसाठी नियमित आरोग्य चाचणी आदी योजना राबविण्यात आल्या आहे. ग्रामपंचायतीने यापूर्वी केलेल्या कामांची दखल घेत ‘निर्मलग्राम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सरपंच बाळकृष्ण म्हस्के उपसरपंच समाधान रंगनाथ जाधव व ग्रामसेवक बाळासाहेब कदम यांनी याकामी विशेष कामगिरी केली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद