शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प; जर्मन कंपनी अनुकूल

By admin | Updated: January 23, 2015 23:31 IST

खतप्रकल्पाची पाहणी : अनेक मुद्यांवर सकारात्मक चर्चा

नाशिक : जर्मनीतील जीआयझेड या कंपनीच्या प्रतिनिधींनी महापालिकेच्या खतप्रकल्पाची पुन्हा एकदा पाहणी करत ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प राबविण्याबाबत अनुकूलता दर्शविली असून, अनेक मुद्यांवर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. दरम्यान, खतप्रकल्प चालविण्यास देण्याबाबतही तीन-चार कंपन्यांशी चर्चा सुरू असून, नियमाच्या चौकटीत राहून त्याबाबतही निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.जर्मनीतील जीआयझेड या कंपनीने पालिकेकडे २०१० मध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ हा प्रकल्प सुरू करण्याची तयारी दर्शविली होती. ३० टन क्षमतेच्या या प्रकल्पासाठी शहरातील हॉटेलमधून निघणारा कचरा आणि सार्वजनिक शौचालयातील मलजलाचा वापर केला जाणार असून, त्यातून होणारी वीजनिर्मिती ही खतप्रकल्पासाठीच वापरली जाणार आहे. ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पासाठी जर्मन सरकार प्रारंभी शंभर टक्के अनुदान देणार होते. परंतु नंतर ८० टक्के अनुदान देण्याचे ठरल्याने प्रक्रिया रखडली होती. दरम्यान, युरोच्या किमतीत झालेल्या बदलामुळे जर्मन कंपनीने महापालिकेला सदर प्रस्ताव स्थगित ठेवण्याची विनंती केली होती. त्यामुळे सदर प्रकल्प अडचणीत आल्याची चर्चा सुरूझाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा जर्मन कंपनीच्या प्रतिनिधींनी खतप्रकल्पाला भेट देऊन पाहणी करत ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शविली असल्याचे आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले. प्रस्तुत प्रतिनिधींनी खतप्रकल्पावरील बंद मशिनरींबाबतही काही सूचना केल्या असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. दरम्यान, खतप्रकल्पावर महापालिका दरवर्षी सुमारे पाच कोटी रुपये खर्च करत आहे. खताचीही निर्मिती १० टक्क्यांच्यावर होत नाही. त्यामुळे खतप्रकल्पही चालविण्यास देण्याबाबत तीन-चार कंत्राटदारांशी चर्चा झाली असून, नियमात चौकटीत राहून त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. (प्रतिनिधी)