शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दारूचे व्यसन सोडविण्यास गेले ; परतताना रस्त्यात मृत्यूने गाठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 16:22 IST

दारूचे व्यसन सोडविण्यासाठी गेलेल्या दोघा संख्या भावंडांचा वणी येथून दुचाकीवर घरी परतत असताना मुंबई आग्रा महामार्गावर गरवारे पॉईंट समोर उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.१७) घडली आहे.

ठळक मुद्दे गरवारे पॉईंटजवळ उड्डान पुलावर भीषण अपघात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन भावांचा जागीच मृत्यू

नाशिक : दारूचे व्यसन सोडविण्यासाठी गेलेल्या दोघा संख्या भावंडांचा वणी येथून दुचाकीवर घरी परतत असताना मुंबई आग्रा महामार्गावर गरवारे पॉईंट समोर उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.१७) घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी येथील गोरख लक्ष्मण जाधव (३५ )व त्याचा लहान भाऊ सोमनाथ लक्ष्मण जाधव ( २५) हे दोघे भाऊ शुक्रवारी (दि. १७) सकाळी आठ वाजेच्या सुमारास इगतपुरी येथून वणी येथे त्यांच्या दुचाकी (एमएच १५, डीपी ४२१४ ने गेले होते. गोरख चा लहान भाऊ सोमनाथ यास दारूचे व्यसन असल्याने त्याचे व्यसन सोडविण्यासाठी दोघे भाऊ वणी येथे गेले होते. तेथील व्यसनमुक्ती करणाऱ्या बाबाला भेटून दोघे भाऊ त्यांच्या दूचाकीवरून घरी परतत असताना मुंबई-आग्रा महामार्गावर गरवारे पॉईंट जवळील उड्डाणपुलावर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोघा भावांचा जागीच मृत्यू झाला असून अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.