शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

पंचवटीत गणरायाचे जल्लोषात स्वागत

By admin | Updated: September 6, 2016 01:14 IST

ढोल-ताशांचा गजर : विधिवत प्रतिष्ठापना

 पंचवटी : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष करीत पंचवटी परिसरात घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळातर्फे लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत करून विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.गणरायाच्या स्वागतासाठी घराघरात तसेच मंडळांचे कार्यकर्ते रविवारी सकाळपासूनच सज्ज झाले होते. गणपती प्रतिष्ठापना विधिसाठी लागणारे पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी शेकडो भाविकांनी बाजारपेठत गर्दी केल्याने बाजारपेठही भाविकांच्या गर्दीने तुडूंब भरली होती. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी बच्चे कंपनीही सकाळपासूनच धावपळ करत होते. प्रतिष्ठापना करण्यासाठी कोणी लाडक्या गणरायाला हातात, कोणी चारचाकी वाहनावर ठेवून ढोल- ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत घराकडे तसेच सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी नेत होते.विघ्नहर्ता गणरायाला घरी आणल्यानंतर कोणी फटाके फोडत तर काहींनी ढोल-ताशांचा गजर करत गणरायाचे स्वागत केले. ठरलेल्या मुहूर्तावर घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळातर्फे गणपतीची आरती करून विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापनेनंतर गणरायाला मोदक व खिरापतीचा नैवेद्य दाखिवण्यात आला. पंचवटी परिसरातील जवळपास शंभरहून अधिक छोट्या मोठ्या मित्रमंडळांनी व घरगुती गणपती बसविणाऱ्यांनी बाप्पांची विधिवत प्रतिष्ठापना केली. पंचवटी परिसरातील गजानन चौक मित्रमंडळ, सेवाकुंज येथील सप्तशृंगी मित्रमंडळ, सत्यबाल मित्रमंडळ, सरदारचौक मित्रमंडळ, मखमलाबाद नाक्यावरील कैलास मित्रमंडळ, शिवाजी चौकातील भगवती कला, क्र ीडामंडळ, पेठरोडचे शिवनेरी फ्रेंड सर्कल, नवीन आडगाव नाका मित्रमंडळ, नागचौक मित्रमंडळ, तारवालानगर मित्रमंडळ, शंभुराजे फ्रेंड सर्कल आदिंसह पंचवटी कारंजा, दिंडोरीरोड, पेठरोड, आरटीओ परिसर, मालेगाव स्टँड, म्हसरूळ, मखमलाबाद, नांदूर, मानूर, पंचवटी गावठाण, हिरावाडी, अमृतधाम, साईनगर, हनुमाननगर, भागातील सार्वजनिक मित्रमंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. (वार्ताहर)