शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

शिवज्योत मशाल यात्रेचे आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:17 IST

नाशिक : आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात गरूडझेप शिवज्योत मशाल यात्रेचे स्वागत करण्यात आले. औरंगजेबाच्या तावडीतून ...

नाशिक : आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात गरूडझेप शिवज्योत मशाल यात्रेचे स्वागत करण्यात आले. औरंगजेबाच्या तावडीतून छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्रा येथून स्वत:ची सुटका केल्याच्या घटनेला ३५५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आग्रा ते राजगड अशी शिवज्योत मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचे आडगाव येथील मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील व शिक्षणाधिकारी डाॅ. नानासाहेब पाटील यांनी स्वागत केले.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरील ग्रंथ भेट देऊन पाहुण्याचा सत्कार करण्यात आला. ही यात्रा आग्रा येथून निघून नाशिकमार्गे राजगडाकडे मार्गस्थ झाली, या दरम्यान दोन हजार वृक्ष बीजारोपण, ५५ किल्ल्यांवरून घेतलेले जल, आग्रा येथील शिवस्मारकाजवळील माती घेऊन हे शिवप्रेमी राजगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिषेक करणार असल्याची माहिती यात्रेच्या संयोजकांनी दिली. यावेळी मोहिमेचे प्रमुख डॉ. संदीप माहिंद तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळाचे प्रमुख नरवीर पिलाजी गोळे यांचे वंशज ॲड. मारुती गोळे उपस्थित होते.

 

गरुडझेप शिवज्योत मशाल यात्रेचे स्वागतप्रसंगी डॉ. वंसतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डाॅ.मृणाल पाटील समवेत डाॅ.नानासाहेब पाटील, डॉ. संदीप माहिंद ,ॲड.मारुती गोळे