शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

By admin | Updated: July 10, 2017 00:04 IST

इगतपुरी : परिवहन महामंडळाचा ६९ वा वर्धापन दिन आगार व्यवस्थापक बी. एस. चतुर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कइगतपुरी : महाराष्ट्राची प्रवासी विकासवाहिनी व ग्रामीण भागाची सुखरूप प्रवासाची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या परिवहन महामंडळाचा ६९ वा वर्धापन दिन आगार व्यवस्थापक बी. एस. चतुर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी चतुर यांनी एसटीचा इतिहास सादर करताना सांगितले की, खेडी, पाडे आणि वाडी- वस्त्यांवरील विश्वासाची व सुखरूप प्रवासाची खात्री असलेल्या एसटीची बऱ्याच ठिकाणी आजही मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जाते. मात्र नजीकच्या काळात अनेक प्रवाशांनी खासगी वाहनांनी प्रवास करण्यास पसंती दिल्याने आपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र ग्रामीण भागातील व आता शहरी भागातील जनताही सुखरूप प्रवासासाठी, इच्छित स्थळी जाण्यासाठी एसटीला अग्रक्रम देत आहेत. शासनाने खासगी प्रवासी वाहतुकीस आळा बसावा व प्रवाशांना अल्पदरात आरामदायी प्रवास व्हावा याकरिता येत्या काही महिन्यांत १२०० नवीन आरामदायी बसेस सुरू करण्याचा महामंडळाचा मानस आहे. आता प्रत्येक एसटीवर ‘जय महाराष्ट्र’ असे ब्रिदवाक्य लिहिलेले दिसणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एसटीचे प्रवासी धोरण म्हणजे व्यापार नसुन सेवा कार्य आहे, असे चतुर यांनी सांगितले.एसटी कामगार संघटना ही एसटी महामंडळाला व प्रवाशांना वेळोवेळी सहकार्याची भूमिका बजावत कामगारहित जोपासत असते. महामंडळाच्या विकासाचे ध्येय ठेवून कामगार सतत एकजुटीने कार्यरत असतात, असे कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक बोराडे यांनी सांगितले.आगार व्यवस्थापक बी. एस. चतुर, स्थानकप्रमुख व्ही. वाय. ढेपणे, स. का. अ. पी. आर. देवीकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक बोराडे यांसह सर्व कर्मचारी व प्रवासी यावेळी उपस्थित होते. अशोक बोराडे यांनी सूत्रसंचालन केले. पी. आर. ढेपणे यांनी आभार मानले.