शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नवागतांचे स्वागत : गुरुजनांकडून विद्यार्थ्यांचे औक्षण

By admin | Updated: June 16, 2017 00:54 IST

नवागतांचे स्वागत : गुरुजनांकडून विद्यार्थ्यांचे औक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : प्राथमिक शाळांची पहिली घंटा गुरुवारी (दि.१५) सकाळी वाजली. नवीन गणवेश, बूट, पाठीवर दप्तर घेऊन बालगोपाळांनी आई-बाबा, आजी-आजोबा यांचे बोट धरून शाळेचा उंबरा ओलांडला आणि सजलेल्या शाळांचे वर्ग बालकांनी गजबजून गेले.नवागतांचे गुरुजनांनी औक्षण करत गुलाबपुष्प व खाऊ देऊन स्वागत केले. समारंभपूर्वक त्यांच्या हातात पाठ्यपुस्तके पडल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. शाळेच्या मैदानात रांगेत उभे राहून नवागत बालकांनी प्रथमच राष्ट्रगीत व प्रतिज्ञा म्हटली. पहिला दिवस असल्यामुळे महापालिकेच्या शाळांपासून तर खासगी शाळांपर्यंत सर्वांनीच आवारासह वर्गखोल्याही स्वच्छ केल्या होत्या. वर्गखोल्यांच्या उंबऱ्यावर आंब्याच्या पानांसह झेंडू फुलांची तोरणं आणि वर्गखोल्यांमध्ये पताका लावून सजावट करण्यात आली होती. तसेच रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या. एकूणच शहरात नवागत विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, पहिल्यांदाच हाती आलेली पाठ्यपुस्तके बघून विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. चिमुकले मोठ्या कुतुहलाने पाठ्यपुस्तके न्याहाळताना दिसून आली. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व वर्गांमध्ये शिक्षणाला प्रारंभ करण्यात आला. शाळांनी प्रवेश उत्सव साजरा करत प्रभातफेरी काढली.