शहरं
Join us  
Trending Stories
1
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
2
अमेरिका-चीनशी स्पर्धा; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, PM मोदींचा मोठा निर्णय...
3
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
4
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
5
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
6
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
7
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
8
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
9
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
10
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
11
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
12
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
13
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
14
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
15
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
16
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
17
Krishna Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
18
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
19
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
20
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!

वाद्यांच्या गजरात नवागतांचे स्वागत

By admin | Updated: June 20, 2014 22:18 IST

नाशिक : जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विविध उपक्रम राबविण्यात येऊन नवागतांचे स्वागत करण्यात आले.

नाशिक : जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विविध उपक्रम राबविण्यात येऊन नवागतांचे स्वागत करण्यात आले. शिक्षणाविषयी जनजागृती-साठी प्रभातफेरी काढण्यात आली. सिन्नर : शहर व तालुक्यातील सर्व शाळांचा पहिला दिवस नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तके वाटपात गेला. विद्यार्थ्यांना आकर्षितकरण्यासाठी गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. दुपारी रोजच्या खिचडीऐवजी गोडघास म्हणून शिरा देण्यात आला. बालवाडीनंतर प्रथमच शाळेत दाखल झालेल्या चिमुकल्यांचा पहिला दिवस मजेत गेला . फुले विद्यालय : येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पोपट गोळेसर यांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. नवागतांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. पवार शाळा : येथील सावित्रीबाई पवार प्राथमिक शाळा व श्री माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्रीमती एस.के. शुक्ल यांच्या हस्ते चॉकलेट, गुलाबपुष्प देऊन नवागतांचे स्वागत केले. मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.भिकुसा हायस्कूल : मध्ये गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस पुस्तकदिन म्हणून पाळण्यात आला. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. पोषण आहारात विद्यार्थ्यांना गोडपदार्थ देण्यात आले. देवपूर : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. सकाळी गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. शाळेत सेमी इंग्रजी वर्गाचा शुभारंभ करण्यात आला. मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी ग्रामशिक्षण समिती अध्यक्ष रवींद्र गडाख, रामनाथ बिडवे, कैलास गवळी, बापू बिडवे, श्रीमती सुनीता उगले आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. शहापूर : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ढोल-ताशांच्या गजरात शिक्षण पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक मारुती आव्हाड, श्रीमती आश्विनी वाघाळे, मनीषा सोनवणे आदिंसह शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. डी. एम. भन्साळी इंग्लिश स्कूल चांदवड : येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. श्री. डी.एम. भन्साळी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी प्राचार्य सौ. व्ही.डी. मारणे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले. लहान नर्सरी गटातील वर्गात केक कापून विद्यार्थ्यांचे आगळेवेगळे स्वागत करण्यात आले, वर्गाला फुगे, रिबन लावून सजविण्यात आले होते. नांदूरशिंगोटे : येथील प्राथमिक शाळेत गटशिक्षणाधिकारी ए. आर. पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक सत्राचा शुभारंभ करण्यात आला. शाळेचे वर्ग सुभोभित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प, चॉकलेट देण्यात आले. दुपारच्या मध्यान्ह भोजनात व्हेज पुलाव व गूळ लापशी असे मिष्टान्न भोजन देण्यात आले. मुख्याध्यापक श्रीमती एस.के. सोमवंशी यांनी स्वागत केले. सोनांबे : पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. नवागतांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विलास पवार, वर्षा सूर्यवंशी, ज्योती रत्नाकर, गंगाराम पवार, निसार शेख, दीपक जगताप आदि उपस्थित होते. पांढुर्ली : येथील जनता विद्यालयात पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले, तर पाचवीच्या वर्गात आलेल्या नवागतांचे गुलाबुपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. निमगव्हाणला पाठ्यपुस्तके वाटप चांदवड : तालुक्यातील निमगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. लाभार्थी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच श्रीमती शकुंतला संजय शिंदे, रतन ठोंबरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान पवार आदि उपस्थित होते. दरेगावला पुस्तकदिन साजरादरेगाव : चांदवड तालुक्यातील दरेगाव जिल्हा परिषद शाळेत पुस्तकदिन साजरा झाला. गावातून शिक्षणफेरी काढण्यात आली. शालेय परिसर पानाफुलांनी सुशोभीत करण्यात आला. पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, शालेय पुस्तके व गणवेश वाटप करण्यात आले.यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष समाधान जाधव, सौ. वैशाली पगार, संजय गरुड, बाळकृष्ण देवरे, श्रीराम पगार उपस्थित होते. जनता विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागतदेवळा : जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, नांदगाव या विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य प्रवीण पाटील यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच सर्वशिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. बैलगाडीतून सवाद्य मिरवणूकरेडगाव खुर्द : शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सवाच्या औचित्यावर चांदवड तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या येवला तालुक्यातील मुरमी येथे मुख्याध्यापक सयाजी ठाकरे व सहकाऱ्यांनी शासनाच्या या उपक्र माला गावाच्या उत्सवाचे स्वरूप देत पहिलीत दाखल होणाऱ्या नवगतांची नारळ, केळीच्या खांबांनी सजवलेल्या बैलगाडीतून सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. मुख्याध्यापक ठाकरे यांनी केंद्रप्रमुख गुलाबराव संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमात जीव ओतून प्रवेशोत्सवाची तयारी केली. आदल्या दिवशी शाळा व परिसर स्वच्छता करून पालक व ग्रामस्थ यांना निमंत्रण दिले. शाळेच्या पहिल्या दिवशी रांगोळी, आंब्याचे तोरण लावून सजावट केली. नवागत बालकांची धार्मिक कार्यक्र माप्रमाणे सजवलेल्या बैलगाडीतून गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान पहिली ते चौथीच्या शासन आदेशानुसार गणवेश व पाठ्य-पुस्तकांचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी विलास पानसरे होते. यावेळी सरपंच हिराबाई शिंदे, अमृता शिंदे, परसराम शिंदे आदिंसह पालक, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गुंजाळ विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत चांदवड : चांदवड येथील जे. आर. गुंजाळ विद्यालयात पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी चांदवडचे सरपंच विजय कोतवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास शालेय समिती सदस्य उत्तमराव पवार, अशोक व्यवहारे, परशराम वाळुंज, मनोहर बनकर, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत गवळी, राजेंद्र देवरे, सचिव एच.के. ंठाकरे आदि मान्यवर उपस्थितीत होेते. स्वागत प्राचार्य एस.बी. बच्छाव यांनी केले तर प्रास्ताविक पर्यवेक्षक वाय. एन. देवरे यांनी केले. शहरातून फेरी काढण्यात येऊन शाळेच्या पहिल्या दिवसाचे वातावरण निर्माण करण्यात आले. आभार पी.के. कुरणे यांनी मानले.