शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘क ीप होप अलाइव्ह’ सायकल रॅलीचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:23 IST

दिव्यांगाप्रती समाजात प्रतिष्ठा निर्माण व्हावी तसेच अंध बांधव समाजापेक्षा वेगळे नसून ते आपल्यातीलच एक सदस्य आहेत, असा संदेश देत दिल्ली येथील अंध सायकलिस्ट बुधवारी (दि. २५) नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

नाशिक : दिव्यांगाप्रती समाजात प्रतिष्ठा निर्माण व्हावी तसेच अंध बांधव समाजापेक्षा वेगळे नसून ते आपल्यातीलच एक सदस्य आहेत, असा संदेश देत दिल्ली येथील अंध सायकलिस्ट बुधवारी (दि. २५) नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.  अमृतधाम परिसरात हे सायकलिस्ट दाखल झाल्यानंतर महापौर रंजना भानसी, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. अमृतधाम येथून तारवालानगर सिग्नल, मार्केट यार्ड सिग्नल, मखमलाबाद रोड, राका स्क्वेअर, चोपडा लॉन्स, चिंतामणी लॉन्स, नरसिंहनगरमार्गे मते नर्सरी परिसरात मुक्कामी थांबले.  मते नर्सरी शगुन हॉलमध्ये शहरातील विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येत या सायकलिस्टचे स्वागत केले. यावेळी ज्ञानम गंगाचे राजेश शुक्ल यांनी या रॅलीची संकल्पना स्पष्ट करताना नेत्रदान, अवयवदानाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले तसेच नाशिककरांनी केलेले स्वागत अनपेक्षित असल्याचेही नमूद केले.  अमृतधाम येथून निघालेल्या या सायकलिस्टसोबत नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सायकलिस्टने सहभागी होत मते नर्सरीपर्यंत सायकलिंग करत या मोहिमेला पाठिंबा दर्शविला.  शगुन हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी माजी महापौर प्रकाश मते, माणिकराव कोकाटे, अशोक मते, पोपट शिंदे, राजीव ठाकरे, किरण चव्हाण, राजा जॉली, रामेश्वर कलंत्री, राजेंद्र निकम, अशोक मते, संजय बोडके, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार आदींसह नाशिक सायकलिस्ट, नॅब, निवेक, भारत स्काउट-गाइड संस्थेचे सदस्यदेखील उपस्थित होते.ज्ञानम गंगा यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या सायकल रॅलीत विशिष्ट टॅण्डम प्रकारच्या सायकलवर पुढे डोळस व्यक्ती आणि मागे अंध व्यक्ती असा रविवार, दि. १५ आॅक्टोबरपासून नवी दिल्ली येथून प्रवास सुरू केल्यानंतर ढोलपूर, ग्वाल्हेर, शिवपुरी, गुना बियोरा, शाहजहानपूर, इंदूर, सेंधवा, धुळे मार्गे नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर गुरुवारी (दि. २६) सकाळी ९ वाजता मुंबईच्या प्रवासाठी रवाना होणार आहेत. मुंबईला ही रॅली रवाना होण्यापूर्वी शगुन हॉलपासून मुंबई-आग्रा महामार्गावरील गरवारे पॉईण्टपर्यंत नाशिक सायकलिस्टचे सायकलिस्ट सहभागी होत या बांधवांना निरोप देणार आहेत.