शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आॅगस्ट क्रांती जागर यात्रेचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:09 IST

संगमेश्वर : शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शिक्षणाचे बाजारीकरण आदी वर्तमान प्रश्नांकडे डोळेझाक करून मोदी सरकार नवनवीन मुद्दे शोधून कांगावा करीत आहे. त्यामुळे देशातले वातावरण कधी नव्हे ते गढूळ झाले आहे. त्याविरुद्ध जनजागरण करण्यासाठी राष्टÑ सेवा दलाने कंबर कसली असल्याची माहिती राष्टÑ सेवा दलाचे राष्टÑीय अध्यक्ष प्रा. सुरेश खैरनार यांनी दिली.

संगमेश्वर : शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शिक्षणाचे बाजारीकरण आदी वर्तमान प्रश्नांकडे डोळेझाक करून मोदी सरकार नवनवीन मुद्दे शोधून कांगावा करीत आहे. त्यामुळे देशातले वातावरण कधी नव्हे ते गढूळ झाले आहे. त्याविरुद्ध जनजागरण करण्यासाठी राष्टÑ सेवा दलाने कंबर कसली असल्याची माहिती राष्टÑ सेवा दलाचे राष्टÑीय अध्यक्ष प्रा. सुरेश खैरनार यांनी दिली.आॅगस्ट क्रांती दिनाला यंदा ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने राष्टÑ सेवा दलाच्या वतीने आॅगस्ट क्रांती जागर यात्रा आज मालेगाव शहरात आली होती. या यात्रेचे या. ना. जाधव विद्यालयात विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी प्रा. खैरनार हे बोलत होते. खैरनार पुढे म्हणाले की, दलितांवर हल्ले होत आहेत. दोन समाजात गोहत्या बंदीवरून नाहक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होत आहे. देशातले हे वातावरण खेदजनक आहे. मूळ प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी भावनिक प्रश्नांवर राजकारण केले जात आहे. प्रसिद्धीमाध्यमे ताब्यात घेतली जात आहेत. आगामी काळात जातीनुसार देशाचे तुकडे होतील. या सर्वांविरुद्ध सेवा दलाने देशभर जनजागरण सुरू केले आहे. नंदुरबार नजीकच्या रावळापाणी या आदिवासी बहुल गावातून यात्रेस ३१ जुलैपासून प्रारंभ करण्यात आला आहे. साक्री, मालपूर कासारे, शहादा, धुळे मार्गे ही यात्रा दि. ८ आॅगस्ट रोजी मुंबई येथे पोहोचेल. १९४२ च्या आंदोलनात राष्टÑ सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. ‘चले जाव’ ही घोषणा युसुफ मेहेरअली या समाजवादी कार्यकर्त्यानेच सर्वप्रथम दिली असल्याची आठवण करून दिली. दरम्यान, शहरातील छत्रपती शिवाजी पुतळा येथे या जागर यात्रेचे मालेगावच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. या. ना. जाधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ढोल व लेजीम पथकाच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. आंबेडकर पुतळा, संगमेश्वर मार्गे यात्रा नेण्यात आली.यावेळी डॉ. सुगन बरंठ, भास्कर तिवारी, अशोक फराटे, नचिकेत कोळपकर, अशोक पठाडे, संजय जोशी, विकास मंडळ, अनिल महाजन, राजेंद्र भोसले, ज्योती भोसले, जयेश शेलार, दत्ता वडगे, अ‍ॅड. जे. आर. अहिरे, स्वाती अहिरे, अल्लाउद्दीन शेख आदि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यात्रेत ५५ स्वयंसेवकांसह झांजपथक सामील झाले आहे. शहरात ठिकठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले.